मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी येथे झालेल्या शिवसेना कार्यकर्ता मेळावा घेण्यात आले होते त्या दरम्यान राजाराम गावातील वार्ड क्र 3मधील पंचशील बौध्द बांधवांनी मागील एक वर्षापासून आम्ही कमी विद्युत दाबाच्या समस्यामुळे त्रस्त झालो आहो,आम्हाला पुष्कळ त्रास सहन करावा लागत आहे.एकीकडे कमी दाबाचा पुरवठा तर, दुसरीकडे डासाचा पादुर्भाव चांगला निद्रा जावं तरी तरी कशे हा जठील प्रश्न उद्भवत होता म्हणून शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ कोरेत यांना निवेदन देण्यात आले आहे.हीं समस्या दूर करावे अशी निवेदनातून विनंती केली होती. त्याच अनुषगाने आज संदीप भाऊ कोरेत यांनी राजाराम येथिल वार्ड क्रं 3 दलीत बांधवांशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्याची समस्या जाणून घेतली व लवकरच तुमच्या समस्या सुटतील असा ठोस आश्वासन देण्यात आले आहे. या वेळी सामाजिक कार्यकर्ते अमित भाऊ बेझलवार, उपस्थित होते तर, पंचशील बौध्द वाशीय मंडळाचे अध्यक्ष साईनाथ दुर्गे, सचिव भिमराव गोंगले, राजेश दुर्गे, मधुकर गोंगले, व्यंकटेश दुर्गे, व्यंकटेश गोंगले, धनंजय शेगावकर, विलास दुर्गे, किशोर गोंगले, संतोष दुर्गे, इत्यादी नागरिक उपस्थित होते.

