मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट शहर आता अवैध धधांचे माहेर घर बनत असल्याचे दिसून येत आहे. शहर आणि परिसरात माफेडान सारखे अमली पदार्थ, अवैध दारू विक्री, वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे शासन आणि पोलिस प्रशासनाचा काही धाक उरला की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हिंगणघाट शहरात विविध पक्षाचे, संघटनाचे दुपत्ते आता तस्करी करणारेचे कवच सारखे काम करीत असल्याचे चित्र आहे. दूपत्ते टाका आणि अवैध कामाला लागा असे धोरण सुरू आहे. अधिकारी तुमचे काहीही बिघडू शकत नाही, अशी देखील हमी मिळत आहे.
आता तर मोठ्या प्रमाणात गाय तस्करी आणि माफेडन सारखे अमली पदार्थ चे मोठ्या प्रमाणात अवैध रित्या चलन होत असल्याने या अवैध लोकांची रेलचेल सुरू आहे. पण दुसरी कडे या मुळे युवा वर्ग या नादी लागून आपले जीवन उध्वस्त करीत असल्याचे चित्र दिसत आहे. आता तर प्रत्येक वार्डात आणि ग्रामीण भागात माफेडान, गांजा आणि दारू ची खुले आम विक्री होत आहे. यांची तर इतकी हिम्मत वाढली आहे की, ये केव्हाही आणि कुठेही या वस्तू विकताना दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांची भूमिका वादग्रस्त अशीच आहे. शहर व परिसरातील १६ ते २४ वयोगटातील युवा वर्ग याच्या आहारी जात आहे. आणि यामुळे मोठ्या प्रमाणात या युवा वर्गात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.
या अवैध धंद्यांना महसूल आणि पोलीस प्रशासन चे वरदहस्त असल्याची चर्चा आहे. जेव्हा पासून हिंगणघाट मधे सेलू येथून आलेले ठाणेदार रूजू झाले तेव्हा पासून या अवैध धंदे वाल्याची हिम्मत वाढलेली आहे. आणि यामुळे या अवैध धंदेवाले जास्त चेकाळले आहे. यांची हिम्मत इतकी वाढली आहे की, पत्रकारला देखील जुमानत नाही. हे अवैध धंदेवाले बुकी; माझे बोर्ड वर अकराव्या नंबर वर नांव आहे. आणि कोणी लघवीला गेलं तरी मला त्याचं नाव माहित असत, आणि तेव्हा पत्रकार मोठा की मि मोठा, असे बोलन्यास ही कचरत नहीं. या प्रकरणी पुलिसाची संधि साधु भूमिका दिसून येत आहे. म्हणजे या अवैध धंदे वाल्याना दारू सोबत चखणा फ्री असल्याचे दृष्य दिसत आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक यांना नागरिकांची विनंती: हिंगणघाट पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याला ऊत आला आले त्यामुळे अनेक तरुण यात फसले जात आहे. त्यांचे आयुष्य बरबाद होत आहे. त्यामुळे हिंगणघाट शहरातील नागरिकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना नागरिकांची विनंती करत यावर लगाम घालण्याची मागणी केली आहे.

