प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- भूगाव येथील में. इवोनिथ स्टील मेटॅलिक कंपनीत कार्यरत 1800 पेक्षा अधिक कामगारांच्या जीवन – मरणाशी संबंधित मूलभूत समस्या, मागण्यांसाठी अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभमीवर इवोनिथ श्रमिक संघाचे व अंबिका सोशल फाऊंडेशनचे संघटना, वीरांगणा ब्रिगेड या सर्व संघटनेने कामगारांच्या मागण्या मान्य होतपर्यंत “संघर्ष जारी रहेगा” अशी प्रतिज्ञा केली आहे.
या अनुषंगाने इवोनिथ कंपनीच्या कामगारांसह आज अंबिका हिंगमीरे यांनी मुंबई येथे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्याचे आदेश सचिवांना दिले. या पुढाकाराबद्दल अण्णासाहेब बनसोडे यांचे अंबिका हिंगमीरे यांनी आभार मानले.
याप्रसंगी इवोनिथ श्रमिक संघाचे अध्यक्ष रवी सांडे, सतीश झाडे, अंबिका सोशल फाऊंडेशनचे रविराज घुमे, वीरांगणा ब्रिगेडच्या कांचन सुखदेवे उपस्थित होते.

