दोन वर्षापासून ग्रामपंचायतची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत : शरद ठाकरे
युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
नागपूर:- जिल्हातील कळमेश्वर पासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेले सोनेगाव पोही गट ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत मध्ये संपूर्ण परिसरात मागील काही दिवसांपासून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच नव्याने इमारत तयार झालेली असून या ग्रामपंचायतला कमीत कमी 20 लाख रुपयेचा निधी मंजूर झाला असून भव्य दिव्य इमारत उभी करण्यात आली तसेच ग्रामपंचायत मधील सुरक्षा भिंतीला सामान्य फंडातून पाच लाख रुपयाचा निधी खर्च करण्यात आले आहे. येथील सचिव सुषम जाधव व सरपंच यांनी गेल्या अनेक वर्षापासून बाहेरगावील मजदूर ग्रामपंचायत मध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्यामुळे या ग्रामपंचायत मध्ये संपूर्ण घाण तयार झालेली आहे. तिथेच आंघोळ करणे, कपडे धुणे, ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये काडाया ठेवणे, स्वयंपाक करणे व सर्व आपला उदरनिवाह त्या ग्रामपंचायत मध्ये त्यांनी वास्तव करून ठेवलेला आहे.
त्याचप्रमाणे सर्व कपडे धुतलेले त्या ग्रामपंचायतीवर जेणे करून ते सजवण्यासाठी ठेवल्यासारखे तोरणे लावलेल्या आहेत. कपडे वाळू घालतात त्यामुळे त्या सर्व ग्रामपंचायत परिसरात व राहणाऱ्या खोलीत सर्व जिकडे तिकडे घाण पसरलेली आहे आणि ते मजूर त्या घाणीत राहतात पण शासन व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे तिथे रोगराईचे प्रमाण वाढत आहे अनेकदा सरपंच सचिवांना तक्रार करूनही ते त्या तक्रारीचे निवारण करत करत नाही जेणेकरून ते त्यांचेच रिश्तेदार आहे अशी वागणूक देत आहे. येथील ग्रामपंचायतच्या समोरील भागात महात्मा गांधी व थोर महापुरुषांचे चित्र रेखाटले आहे फोटो आहे आणि त्या फोटोच्या खाली घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे.
जिथे स्वच्छ भारत मिशनचे बोर्ड लागलेले आहे तिथे स्वच्छ नसून घाण पसरून तिथेच सर्व घाण केलेली आहे. जागोजागी कचऱ्याचे ढिगारे तयार झालेले आहे आज 2 ऑक्टोंबर हा महात्मा गांधीजींचा जयंतीचे ठिकठिकाणी कार्यक्रम करत असून आणि येथील ग्रामपंचायत मध्ये त्या घाणीचे साम्राज्य दाखवून आपल्या गाव यांच्या अस्वच्छतेकडे नेण्याचा प्रयत्न दिसत आहे आणि आत्ताच दोन वर्षात ते इमारत उभी केली असता त्या इमारतीचा भिंतीला पूर्ण क्रॅक गेलेल्या पडण्याच्या व्यवस्थित लागलेले आहे उद्घाटना आधीच या भिंतीला भेगा पडणे म्हणजेच हे काम निष्कृष्ट दर्जाचे झाल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले यामुळे येथील ग्रामपंचायत सदस्य शरद ठाकरे व गावकरी सरपंच सचिवांना धारेवर धरतात परंतु येथील सचिव व सरपंच रूपालीताई पुणटकर आठ मोठ्या धोरणाचे असल्यान असल्याने गावकऱ्यांना ऐकण्यास तयार नाही ग्रामपंचायत सचिव सुषम जाधव सरपंच यांच्या संगमताने इमारत निकृष्ट दर्जाची बांधण्यात आली आहे असे स्थानिक नागरिकांचे मान्य आहे त्याचप्रमाणे सायंकाळच्या वेळेस तिथे गावातील काही नागरिक या इमारतीमध्ये मद्यपान करतात करतात असे आढळून आलेले आहे तसेच येथील दलित वस्ती मंजूर झाली असून त्या कामाची अंदाजे किंमत चार लक्ष पन्नास हजार झाल्याचे दिसून आलेले आहे या या दलित वस्तीचे काम व रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. या दलित वस्तीच्या संदर्भात पंचायत समिती येथील खंडविकास अधिकारी व संबंधित इंजिनियर यांच्याशी चर्चा केली असता ते काम योग्य आहे चांगल्या प्रकारे आहे असे पळवा पळवीचे उत्तर देण्यात आली. या संबंधात कोणतेही काम योग्य झालेले नाही असे गावकऱ्याची तक्रार आहे. येथील दलित वस्तीचे कोणतेही काम व्यवस्थित झालेलं नाही सर्व टेम्पररी काम करून सरपंच सचिव यांनी सर्व निधी एकतर्फी पडलेला दिसून आलेलं आहे. तसेच वार्ड क्रमांक दोन मधून खापरी सोनेगाव जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असून ते सर्व निकृष्ट दर्जाचे लक्षात येत आहे.
या सर्व प्रकारासाठी मी शरद ठाकरे ग्रामपंचायत सदस्य सोनेगाव त्या कामाच्या संदर्भात वरिष्ठांना फोन केला असता ते पळवा पळवी चे उत्तर देतात तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून योग्य न्याय मिळवून द्यावा याबद्दल मी अनेक तक्रारी केल्या परंतु कोणताही अधिकारी याकडे लक्ष न लक्ष न दिल्यास मी व माझे गावकरी आपल्या कार्यालया उपोषणाला बसणार अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य शरद ठाकरे प्रमोद जी ठाकरे संदिप सोनपि तडे सुरेश बोरकर प्रवीण सोमकुवर जी क्रांतेश्वर टोंगे राधाबाई ठाकरे अनिता बाई ताजणे वैशाली टोंगे चंद्रकलाबाई नागपुरे मायाताई धुर्व अंबर ठाकरे गजानन ठाकरे व आम्ही गावकरी नागरिक त्याचप्रमाणे आम्ही यासंदर्भात चौकशी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडवणीस साहेब यांच्याकडे केली आहे.