प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय जनता पार्टी हिंगणघाट प्रभाग क्रमांक 14 च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती तसेच प्रभागातील एचएससी व एसएससी बोर्ड परीक्षेत यश प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांच्या अध्यक्षतेखाली व भाजप जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे यांनी विशेष उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून महेश ज्ञानपीठच्या मुख्याध्यापिका वैशाली पोळ, ॲड. रवींद्र मद्दलवार, कॅम्पस एज्युकेशन चे संपादक गणेश मुंगले यांनी शोभा वाढवली. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या नलिनी सयाम यांच्यासह भाजप कार्यकर्ते व प्रभागातील नागरीक उपस्थित होते.

