संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- उत्तम प्रशासक, कुशल राजकारणी, परोपकारी आणि कर्तृत्ववान राणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी (३०० व्या) जयंती निमित्त इंदिरा जिनींग राजुराचे कार्यालय येथे चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत सकाळी १० : ४५ वाजता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष दिनकर कर्नेवार, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, माजी सभापती कुंदाताई जेनेकर, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, अशोक राव, संघपाल देठे, सिद्धार्थ राहुलगडे, संतोष मेश्राम यासह काँग्रेसच्या फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

