प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा: दरवर्षी 10 जुन हा दिवस डॉ. भालचंद्र दृष्टी दीन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून दि.10 ते 24 जुन या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन डॉ. भालचंद्र दृष्टी दीन पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवाड्याचा शुभारंभ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ यांच्या हस्ते करण्यात आला.
सामान्य रुग्णालय येथे आयोजित भालचंद्र दृष्टी दीन पंधरवाड्याच्या शुभारंभ प्रसंगी नेत्र विभाग प्रमुख डॉ. मनोज सक्तेपार, वैद्यकीय अधिक्षक डॉ. एम.बी. सुटे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. प्रिती पराटकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. किर्ती करोटकर, डॉ. प्रफुल मेश्राम, सहाय्यक अधिसेविका शालिनी कोरेटी, इंदिरा शेंडे, परिसेविका संगीता काकडे आदी उपस्थित होते.
पंधरवाडा कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी नेत्र चिकित्सा अधिकारी यांच्या मार्फत नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात नेत्रदानाविषयी जनजागृती करुन संमती पत्रके भरुन घेण्यात येणार आहे. नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे संचलन नेत्रदान समुपदेशक प्रफुल काकडे यांनी केले तर आभार नेत्र चिकित्सा अधिकारी अनिल वरघट यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगदीश कोकाटे, प्रतिक जयस्वाल, रवि वाघमारे, पुजा इटनकर, लिना कुंभरे, शारदा तोडसाम, कोमल उरकुडे, अलोचना नागदेवते, स्वप्नील कुसनाके, वैभव लोणकर यांनी प्रयत्न केले.

