प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:-देवळी ते दिघी मार्गावरील पुलाचे बांधकाम अर्धवट स्थितीत असल्याने, मागील तीन वर्षे बससेवा बंद आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत, आणि रात्री-अपरात्री या मार्गावरून प्रवास करणाऱ्या कामगारांना, शेतकऱ्यांना व इतर नागरिकांना जीव धोक्यात घालून चालावे लागते.
रस्ते आणि पुलांवरची भगदाड डागडुजीच्या निकृष्ट दर्जाची असल्याने, वारंवार खड्डे पडत आहेत. या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने, आज पुलावरील एका खड्ड्यात चार तास बसून आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या वेळी दिघी येथील सरपंच संदीपभाऊ दिघीकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी चक्काजाम केला. बांधकाम विभागाचे अभियंता आंदोलनस्थळी आल्यानंतर, रस्त्याची दुरुस्ती आणि पुलाचे अर्धवट बांधकाम तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका होती.
आंदोलनाच्या तीव्रतेमुळे बांधकाम विभाग जागा झाला आणि शेवटी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता श्री. खानविलकर यांनी आंदोलनस्थळी येऊन चर्चा केली. आज पासूनच दुरुस्ती व पुलाचे बांधकाम सुरू करण्याची हमी दिली. त्यानंतर चार तास चाललेले आंदोलन स्थगित करण्यात आले.
आंदोलनस्थळी दिघीचे सरपंच संदीप दिघीकर, बोपापूरचे सरपंच विनोद दांदडे, प्रविण कात्रे, स्वप्नील मदणकर, ज्योत्स्ना राऊत, राजेश इंगळे, हितेश दिघीकर, सुमित दिघीकर, अमोल दिघीकर, गजानन कडूकार, घनश्याम कांबळे, विजय डवले, विजय कुमरे, देवबाजी कुमरे, मुकुंद जवादे, बाळु आडे, मंथन बावणे, सुमित दिघीकर, हनुमंत पचारे, चेतन इंगळे, पवन तिरकूळ, साहिल पचारे, नरेश दरने, वैभव भोकरे, रवींद्र राऊत, संजय डवले, रोहन आडे, प्रेम धुर्वे, दत्ताजी पारिसे, पवन वडतकर व दिघी बोपापूर येथील असंख्य नागरिक उपस्थित होते.

