माजी आ. सुभाष धोटेंच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा आणि कार्यकर्ता मेळावा संपन्न.
संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती :-– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि जिवती तालुक्यातील काँग्रेसचे पक्षसंघटना मजबूत व कार्यक्षम बनविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी जिवती काँग्रेसमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्याची स्पष्ट भूमिका घेत जिवती तालुक्यातील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते, जिवती नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे यांची जिवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड केली असून पदग्रहण सोहळा आणि कार्यकर्ता मेळाव्यात माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ. सुभाष धोटे यांनी तालुक्यातील तळागाळातील लोकांपर्यंत काँग्रेसची विचारधारा, घ्येय धोरणे पोहचवून गावागावात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी डॉ. अंकुश गोतावळे परिश्रम घेतील असा विश्वास व्यक्त करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर डॉ. गोतावळे यांनी पक्षनेतृत्वाने माझ्यावर विश्वास व्यक्त करीत दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून तालुक्यात काँग्रेसला व्यापक जनसमर्थन मिळवून देण्याचा संकल्प सोडला.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक माजी अध्यक्ष गणपत आडे, प्रमुख अतिथी काँग्रेसचे विधानसभा समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, जेष्ठ आदिवासी नेते भीमराव पाटील मडावी, माजी सभापती प्रा. सुग्रीव गोतावळे, शामराव कोटनाके, अजगर अली, महिला काँ. तालुकाध्यक्ष नंदाताई मुसने, अमोल कांबळे, सीताराम मडावी, तिरुपती पोळे, डोईफोडे मामा, अजगर अली, जबार भाई, दत्ता गिरी,नामदेव कांबळे बाळु पतंगे, जंगु येडमे, शबिरभाई, उत्तम कराळे, गणेश शेठकर, मुनीरभाई, जाधव मामा, मारोती मोरे, शेंबडे मामा शबिरमामु, गणेश वाघमारे, काशिनाथ कोमले, हरिश्चंद्र जाधव, परमेश्वर डुरे, दत्ता तोगरे, दुधगोंडे ,गणेश शेटकर, परमेश्वर केसरे, लक्ष्मण कोडापे, चिन्नू कोडापे, विजय राठोड, प्रल्हाद राठोड, मारोती कांबळे,साबणे, बाबाराव कांबळे नामदेव जुमनाके, भगवान चव्हाण, पांडूरंग भालेराव, बालाजी वाघमारे, देविदास कांबळे केशव भालेराव, रानुबाई काबळे, जयश्री गोतावळे, अनिता गोतावळे, कराडेताई, सुषमा गोतावले, नसरीन शेख, कांबळे ताई,रामदास रणविर, प्रेम राठोड, रंजीत सुर्यवंशी, अजय नरहरे, गोविंद वाघमारे रोहिदास राठोड यासह जिवती काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुग्रीव गोतावळे यांनी केले तर संचलन श्री उत्तम कराळे यांनी व आभार श्री अमोल कांबळे यांनी मानले.

