संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे विद्यार्थ्यांच्या शालेय मंत्रिमंडळाचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न झाला. विद्यार्थी परिषदेची निवडणूक दिनांक २२ जुलै २०२५ ला गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात आली. यामध्ये मतदान इयत्ता ५ ते १० वीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शाळेच्या सर्वांगीण विकासाला मदत करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण रुजवण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि शालेय प्रार्थनेने करण्यात आली. यामध्ये इन्फंट शाळेच्या सीबीएसई व स्टेट शाळेतून मंत्रीमंडळात पदग्रहण स्वीकारणारे हेडबॉय अंश गुरले, विशाल वाघमारे, हेड गर्ल्स प्रिन्सि बाराई, रुक्मिणी येवले पंतप्रधान विशू सिंग, मावीया हुसेन, शिक्षणमंत्री अंशुमन कुळमेथे, विराज सिंग, क्रीडामंत्री ओम चुंबळे, सम्यक रायपुरे. आरोग्यमंत्री अंशुल ताजणे, अक्षरा काळे, सांस्कृतिक मंत्री प्रज्योत उपरे, कु. श्री सोमवंशी, पर्यटक मंत्री प्रज्वल कावळे, अयान शेख, आणि अनुशासन मंत्री पंकज लडके, माही लांडे या विद्यार्थ्यांना शपथविधी मुख्याध्यापिका मंजुषा अलोने यांच्या हस्ते देण्यात आली. तर मार्गदर्शन मुख्याध्यापक रफिक अन्सारी यांनी केले. तर विद्यार्थी प्रतिनिधींनी ही आपले मत मांडले आमच्यावर सोपविलेल्या जवाबदारीची जाणीव ठेवून कर्तव्य योग्य रीतीने पार पाडू असे आश्वासन त्यांनी दिले.
शालेय मंत्रिमंडळाच्या सर्व नवनियुक्त विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक माजी आमदार सुभाष धोटे, सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमररकौर भंगू , मुख्याध्यापक रफिक अन्सारी व विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीचे प्रमुख संतोष सागर ,शोएब शेख, रामकली शुक्ला, सुधीर सर यासह सर्व शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश लढी यांनी केले तर आभार प्रदर्शन शोयब शेख यांनी केले.

