मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिंनाक 28/07/2025 रोजी फिर्यादी आरती शैलेश तन्ना वय 46 वर्षे रा. न्यु यशवंत नगर हिंगणघाट आपले घरी पुजा करीत असतांना दोन अज्ञात आरोपी घरामध्ये आले व फिर्यादीचा तोंड दाबुन चाकुचा धाक दाखवुन सोना निकाल व पैसे निकाल असे म्हणत असतांना फिर्यादी हिने आरोपीचे हाताला चावा घेतल्याने आरोपीने फिर्यादीच्या हातावर चाकु मारून घटनास्थळावर चप्पल व पत्रिका सोडुन पळून गेले त्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रारी वरून कलम 309(6), 331(8). 3. (5) भा.द.वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्या बाबत हिंगणघाट पोलीसांसमोर मोठे आव्हान होते. गुन्हयाचे घटनास्थळी आरोपीने सोडलेली चप्पल, लग्न पत्रिका व परीसरातील सि.सि.टि.व्ही फुटेज व तांत्रीक माहितीचे आधारावर 7 ते 8 संशयीत ईसमांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला सखोल चौकशी करण्यात आली. फिर्यादि यांनी घटनेवेळी एका आरोपीस चावा घेतला असल्याचे सांगीतल्याने ताब्यात घेतलेल्या संशयीत ईसमांपैकी एका इसमाचे हाथावर मानवी चावा घेतल्याचे निशान दिसुन आले. परंतु सदर ईसम हा उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने श्वान पथक, वर्धा यांना पो.स्टे. ला पाचारण करून श्वान पथक प्रमुख पो.उपनि सुजित डांगरे यांनी घटनास्थळी मिळुन आलेल्या चप्पलीचे श्वान यास वास दिला असता सदर श्वानाने सुध्दा मानवी चाव्याचे निशाण असलेल्या त्याच ईसमावर भुंकुन ओळखले.
अशा प्रकारे गुन्हयातील आरोपी नामे फरदिन अनिस अहमद कुरेशी, वय 42 वर्षे, तसेच आरोपी क 2 तौफीक अब्दुल रशिद शेख वय 21 वर्ष, दोन्ही रा. गौतम वार्ड हिंगणघाट यास निष्पन्न करून त्यांची विचारपूस करून अधिक विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. अशा प्रकारे गुन्हा दाखल होताच पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पोलीसांनी 24 तासांचे आत गुन्हा उघडकीस आणुन वरील नमुद आरोपीस गुन्हयात अटक केलेली आहे.
सदरची कार्यवाही ही अनुराग जैन, पोलीस अधिक्षक वर्धा, सदाशिव वाघमारे अपर पोलीस अधिक्षक वर्धा, रोशन पंडीत उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट, देवेन्द्र ठाकुर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे नेमणुकीस असलेले स.पो.नि. दिपक वानखेडे, पो.उपनि. महेश ईटकल, पोहवा किशोर कडू पोहवा जगदीश चव्हाण डी.बी. पथकाचे पोहवा अनुप टपाले, पो.ना. असिम शेख, पो.ना. विवेक वाकडे, पो.अं. विजय काळे, पो.अं. पराग आत्राम, तसेच वर्धा डॉग युनिटचे पो.उपनि सुजिस डांगरे यांनी केली. सदर गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि. दिपक वानखेडे हे करीत आहे.

