राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी:- तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे शारदा महिला मंडळ तर्फे हळदी-कूंकच्या कार्यक्रम भविष्याचा विचार करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने घेतले.आदरणीय पालकमंत्री सूधीरभाऊ मुनगंटीवार यांनी 50 कोटी वृक्षाचा आदर्श ठेवून सर्वांसाठी प्रेरणास्थान ठरले. त्याच धर्तीवर अहिल्यादेवी शारदा मंडळांतर्फे भविष्याची वेध घेऊन पर्यावरण समतोल राखण्यासाठी सर्व भगिणींना रोपांची ओटी भरून पर्यावरणाचा संदेश दिला. साधारणत: प्रत्येक ठिकाणी ब्लाऊज पीस, केळीची ओटी भरत असतात. परंतू यांनी रोपाची फक्त ओटीच नाही तर मंडळातर्फे वृक्षारोपण सूद्धा करण्यात आले. देवीनवरात्र म्हणजे महिलांचे समाजशील वृत्ती, प्रेम तसेच सजग, सुजाण, व्यापक दृष्टिकोन दिसून येते.
या कार्यक्रमाला माजी जि.प.सदस्या सौ वैष्णवी अमर बोडलावार,तसेच सरपंचा सौ. लक्ष्मीताई सोमेश्वर बालूगवार उपस्थित राहून त्यांचा ऊत्साह वाढविला.या मंडळाचे अध्यक्ष संगीता अम्मावार, उपाध्यक्ष महाकाली अन्नावार, सचिव कांताबाई बोर्लावार, संजना अम्मावार, ऊषा निलावार, गीता गंपलवार, रूपाली बालूगवार, चंदा कंकलवार, बिरूबाई देवावार, पद्मा कंकलवार, सुनीता माडूरवार आदींनी परिश्रम घेतले.

