मानव जातीला वाचवायचे असेल तर वृक्षारोपण करणे गरजेचे: सौ.लताताई मोहता, प्रसिध्द उद्योजीका
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रदुषणामुळे आणि वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या मानव जातीला वाचवायचे असेल तर वृक्षारोपण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजीका सौ.लताताई मोहता यांनी केले.आधार फाऊंडेशन द्वारा आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतुल वांदिले, हिंगणघाट पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर, डॉ.राहुल मरोठी, डॉ.मोहन खेतल, डॉ.विजय मोरे, टीचर असोसिएशनचे श्री.राजू चौधरी, न.पा.अधिकारी प्रवीण काळे, कार्यकारी अध्यक्षा सौ.माधुरी विहिरकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना सौ.मोहता यांनी आधार फाऊंडेशनच्या विविध समाजहिताच्या उपक्रमांचे कौतुक करून झाडे लावा, झाडे जगवा हा अनमोल संदेश आपल्या भाषणातून उपस्थितांना दिला.
कडुलिंबाचा उपयोग अनेक प्रकारे केला जातो. त्याची पाने, फळे, फुले, साल आणि लाकूड उपयोगी आहे.कडुलिंबाच्या पानांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.कडुलिंबाचे लाकूड मजबूत आणि टिकाऊ असते, त्यामुळे त्याचा उपयोग फर्निचर आणि बांधकाम कामात केला जातो. कडुलिंबाच्या बिया आणि फळांपासून तेल काढले जाते, जे त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. कडुलिंब नैसर्गिक कीटकनाशक म्हणूनही उपयुक्त आहे असी माहिती अतुल वांदिले यांनी उपस्थित अतिथींना दिली. प्रारंभी प्रमुख अतिथींना सन्मानचिन्ह व वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. तसेच कडूनिंब प्रजतीच्या वृक्षांचे वृक्षारोपण साई मंदिर, नंदोरी रोड परिसरातील मोकळ्या जागेत करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाची रूपरेषा सुहास घिणमिने यांनी प्रास्ताविकातून मांडली. संचालन जगदीश वांदिले यांनी करून आभार ज्योती धार्मिक यांनी मानले. संरक्षण कठड्यासह लावलेल्या झाडांच्या संरक्षणाची जबाबदारी आधार फाऊंडेशनची पर्यावरण समितीने घेतली. या प्रसंगी आधार फाऊंडेशनचे डॉ.प्रा. शरद विहिरकर, जगदीश वांदिले, लक्ष्मीकांत धार्मिक, मधुकर चाफले, सुनील डांगरे, सुरेश गुंडे, डॉ.शरद मद्दलवार, चंद्रकांत निमट, विठ्ठल घिनमिने, प्रा.गजानन जुमडे, प्रमोद बोरकर, सचिन येवले, अमोल बोरकर, डॉ.अनिता मनवर, ज्योती धार्मिक, माया चाफले, स्वाती वांदिले, अनिता गुंडे, वैशाली लांजेवार,किरण निमट, सुमन डांगरे, मयुरी देशमुख, शुभांगी नायर, निता गजबे, सूचिता सातपुते, वैशाली निनावे, जयश्री पिसे, मनीषा जांभुळे, अंजली बालपांडे, वैशाली हेडाऊ, सौ.साखरकर, भोयरताई, आरती सोमवंशी, कोमल बोबडे, सुनिल पिंपळकर, राहुल खोडे, वासुदेव तडस, भोंगाडे सर, प्रशांत भेदूरकर, संदेश बाराहाते, सतीश कावरे, बाराहाते सर, जोगे सर, शेख इमरान, चेतन वाघमारे, प्रशांत लोणकर, वैभव साठोने आदी मान्यवर उपस्थित होते.

