मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 02 ऑगस्ट रोज शनिवारला स्थानिक शहरातील टिळक चौकातील श्री साईबाबा मंदिर येथून शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख सौ.सुनिता तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली श्रावण महिन्याच्या परंपरेतील महिलांची कावड यात्रा काढण्यात आली. ती यात्रा शहरातील मुख्य मार्गाने पायदळ चालत वना नदीतील गंगाजल कावडमधे घेऊन साईमंदिरात परत येऊन शंभू महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण करून समाप्ती करण्यात आली.
या कावड यात्रेला शिवसेना पक्षाच्या सर्व महिला पदाधिकारी व त्या प्रभागातील महिलांचा मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. तसेच ही कावड यात्रा यशस्वी करण्यासाठी पक्षाचे विधानसभा प्रमुख राजेश हिंगमिरे, तालुकाप्रमुख अमित गावंडे, शहरप्रमुख सुनिता तांबोळी, शहरसंघटीका रजनी गोस्वामी, रोठेताई, झोरेताई, शहरसंघटक अमित काळे, सोनू लांजेवार, उपशहरप्रमुख कुलभूषण वासनिक, विलास हांडे, सतिश तांबोळी व समस्त शिवसैनिकांनी मदत केली. त्यामुळे मोठ्या उत्साहात,आनंदात ही कावड यात्रा यशस्वीरित्या संपन्न झाली.

