अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- डिसेंबर २०२४ ते जुलै २०२५ पर्यंत संजय गांधी, श्रावण बाळ, इंदिरा गांधी वृद्धपकाळ, योजनेचे ८ महिन्यापासून मानधन मिळाले नाही ते मानधन लाभार्थींच्या खात्यात त्वरित जमा करावे तसेच ग्रामपंचायत स्तरावर शिबिरे लावून लाभार्थ्यांच्या अडचणी दूर कराव्या यासाठी. सावनेर उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार सावनेर यांना जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती सावनेर व वंचित बहुजन आघाडी सावनेर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे नागपूर विभागीय अध्यक्ष भगवान चांदेकर तथा वंचित बहुजन आघाडी जिल्हा सहसचिव दादाराव लांजेवार व जिल्हा सदस्य शांताराम ढोके, अश्विन कापसे सावनेर शहर अध्यक्ष धनेश्वर ढोके सावनेर शहर महिला आघाडी अध्यक्षा रमाबाई मेश्राम, उपाध्यक्षा रेखा बोरकर, सचिव कविता सुर्यवंशी, नंदा बागडे, जेष्ठ नागरिक भाऊराव लांजेवार, वसंतराव सुर्यवंशी, मधुकर बोरकर, एकनाथ मेश्राम व आम आदमी पार्टीचे संजय टेंभेकर, दिनेश इंगोले संभाजी ब्रिगेड, रामकृष्णा कोलते, खुशाल छत्रे, दशरथ साळवे, छत्रपाल निकोसे, युवराज राजूरकर, सुरेश कोळमकर, सुभाष गजभिये व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
