आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दि. १ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीच्या निमित्ताने सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे, एवढेच नाहीतर शासकीय, निमशासकीय कार्यालयात सुद्धा अभिवादन करण्यात येत आहेत, त्याच प्रमाणे हिणघाट येथील समाज बांधवांच्या वतीने साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले,जयंती उत्सव साजरा करनेत आला आहे धूप दीप प्रज्वलन करण्यात आले, तर सदर कार्यक्रमाची जयंती मिरवणूक काढण्यात आली यावेळी शेकडोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
हिंगणघाट शहरात राहणाऱ्या युवा तरुण आणि महिलेनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयघोष केला व हिंगणघाट शहरांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी अमोल खंदार, गजानन डोगरे, महेश डोगरे साबळे, सुनील मनोज साबळे सह सामाज्यात अनेक महिला पुरुष उपस्थित होते. यावेळी सागर बावणे अक्षय वावरे सुभाष डोंगरे, पोटफोडे, रमेश डोंगरे, महिला आशा बावणे, पुष्प बावणे, रेखा तेलग, माया पोटफोडे, ललिता डोंगरे, छाया शेंडे इत्यादी उपस्थित होते.