मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- दि. 17 ऑगस्ट 2025 ला विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्था, विद्याभारतीच्या वतीने प्रांतस्तरीय ज्युडो स्पर्धा शाहू गार्डन स्कूल, मानेवाडा, नागपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत भारत विद्यालय, हिंगणघाट येथील 14, 17 व 19 वयोगटातील 14 खेळाडू सहभागी झाले होते यापैकी 11 खेळाडूंनी उत्स्फूर्त विजय नोंदविला.
या स्पर्धेत विजयी झालेले खेळाडू वेदांत दुरबुडे, ऋषिकेश शेंडे, आराध्या भोयर, राशीं सातपुते, भक्ती दुरबुडे, ज्ञानेश्वरी मेश्राम, रुचिता शेंडे ,वैष्णवी बनसोड, पूर्वा कोल्हे, यश मुकतेवार, रणवीर इतवारे या खेळाडूच्या भव्य यशाबद्दल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोकुलदास राठी, उपाध्यक्ष श्यामभाऊ भीमनवार, सचिव रमेशराव धारकर, विदर्भ व देवगिरी प्रांत संघटन मंत्री शैलेश जोशी, विदर्भ प्रांत खेलकुद प्रमुख जितेंद्र घोरदडेकर मुख्याध्यापक हरीश भट्टड, उपमुख्याध्यापक किशोर चवरे, पर्यवेक्षिका मनीषा कोंडावार मॅडम, निलाक्षी बुरीले मॅडम, क्रीडा विभाग प्रमुख विनोद कोसुरकर, क्रीडा शिक्षक संदीप चांभारे, कु. संजना चौधरी आणि सर्व शिक्षकवृंदांनी विजयी खेळाडूंचे मन:पूर्वक अभिनंदन केले व अखिल भारतीय ज्युडो स्पर्धे करिता भोपाल येथे होणाऱ्या अखिल भारतीय ज्युडो स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

