महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन:- एका जावयाने आपल्याच सासूची निर्घुण हत्या करून तिच्या शरीराचे 19 तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याची खळबळजनक घटना कर्नाटक राज्यातील तुमकुरू जिल्ह्यातूनसमोर आली आहे. जावयाने ज्याठिकाणी सासूची हत्या केली आणि तिच्या शरीराचे तुकडे फेकून दिले त्याठिकाणी सीसीटीव्ही नव्हते. त्यामुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहचणं अवघड जात होते. पण अखेर पोलिसांनी या हत्याकांड प्रकरणातील आरोपीला बेड्या ठोकल्या. महत्वाचे म्हणजे आरोपी डॉक्टर आहे.
प्राप्त माहितीनुसार, 7 ऑगस्ट रोजी बंगळुरूपासून 110 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोराटगेरे येथील चिंपुगनहल्ली येते एक कुत्रा तोंडात माणसाचा हात घेऊन फिरताना दिसला. त्यामुळे परिसरात खळबळ माजली लगेच या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शोध सुरू केला. सुरूवातीला पोलिसांना त्या परिसरात काहीच सापडले नाही. पण बराच तपास केल्यानंतर 5 किलोमीटरच्या परिघात 19 वेगवेगळ्या ठिकाणी मानवी शरीराचे तुकडे पोलिसांना सापडले. पण डोकं सापडले नव्हते. पोलिसांनी शरीराचे तुकडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले तेव्हा असे आढळून आले की एका महिलेची हत्या करून शरीराचे तुकडे करण्यात आले होते.
मृतदेह महिलेचा असल्याचे समजले पण ती महिला कोण होती? तिची ओळख पटवणे कठीण झाले होते. तपासात पोलिसांना मृतदेहाच्या तुकड्यासोबत दागिने देखील सापडले होते. त्यावरून हत्या चोरीच्या उद्देशाने केली नसल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी आसपासच्या पोलिस ठाण्यात बेपत्ता महिलांची यादी शोधून काढली. तेव्हा पोलिसांना कळाले की बेल्लवेमध्ये राहणारी ४२ वर्षीय बी.लक्ष्मीदेवीउर्फ लक्ष्मीदेवम्मा ३ ऑगस्टपासून बेपत्ता आहे. लक्ष्मीदेवम्माच्या नवऱ्याने ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली होती.
लक्ष्मीदेवम्माच्या नवऱ्याने पोलिसांना सांगितले होते की, लक्ष्मीदेवम्मा शेवटी मुलगी तेजस्विनीच्या घरी हनुमंतपुराला गेली होती त्यानंतर ती बेपत्ता झाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाला गती आणली तेव्हा कोराटागेरे येथे महिलेचं डोकं सापडलं.
हे डोकं आपल्या बायकोचे असल्याचे लक्ष्मीदेवम्माच्या नवऱ्याने सांगितल्यानंतर पोलिसांनी क्राईम सीन क्रीएट करून अंदाज लावला की महिलेची हत्या प्लानिंग करून केली. तिची हत्या करणारी व्यक्ती ओळखीमधीलच असेल.
त्यानंतर पोलिसांनी एक टीम तयार केली. पोलिसांना माहिती मिळाली की 3 ऑगस्टला एक पांढऱ्या रंगाची कार हनुमंतपुराला आली होती. ही कार कोराटागेरेच्या दिशेने गेली होती. या कारच्या मागे आणि पुढच्या बाजूला वेगवेगळी नंबर प्लेट होती.
याद्वारे आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या कारचा शोध घेतला असता ती एका शेतकऱ्याची निघाली. त्यानंतर पोलिसांनी या शेतकऱ्याला फोन लावला असता त्याचा फोन 3 ऑगस्टपासून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याची कसून चौकशी केली.
त्याने पोलिसांना सांगितले की ही कार 6 महिन्यापूर्वीच डॉ.रामचंद्रया याला विकली होती. हा डॉक्टर हत्या करण्यात आलेल्या लक्ष्मीदेवम्माचा जावई असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी डॉक्टराला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.
सासूची हत्या करण्यासाठी त्याने 4 लाखांची सुपारी दिली होती. सासू सतत आपल्या संसारात ढवळाढवळ करत असल्यामुळे जावयाने तिची हत्या केली असल्याचे तपासातून उघड झाले.

