महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन:- एका नवऱ्याने आपल्याच गर्भवती पत्नीची निर्घुण पने हत्या करून मृत्युदेहाचे तुकडे तुकडे करून एका पिशवीत भरून ते वाहत्या नदीत फेकून दिल्याच्या खळबळजनक घटना समोर आली आहे. स्वाती उर्फ ज्योती महेंद्र रेड्डी असे हत्या करण्यात आलेल्या महिलेच नाव असून आरोपी पतीचं नाव महेंद्र रेड्डी असे आहे. ही घटना तेलंगनातील येथील मेडचल जिल्ह्यातील मेडिपल्ली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या घटनेनं मेडचल जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
22 ऑगस्टला स्वाति गरोदर पणाची तपासणीसाठी जाण्यासाठी नवरा बायको मध्ये वाद झाला होता. त्यानंतर आरोपी पतीने आपल्या पत्नीची हत्या करण्याचा बेत आखला. त्यानंतर शनिवारला आरोपी पतीने आपल्या 25 वर्षीय पत्नी स्वातिची हत्या केली. ती दी. पंजागुट्टा कॉल सेंटर मध्ये काम करत होती. आरोपी महेंद्र याने आपल्या पत्नीचा गळा दाबून हत्या केली त्यानंतर त्याने पहिलेच खरेदी करून आणलेल्या हैकसॉ ब्लेड ने तिच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. त्यानंतर आरोपी महेंद्र तीन वेळा मूसी नदीच्या तीरावर जाऊन त्याने स्वातिचा कापलेले मुंडके, हाथ आणि पाय प्लास्टिक मध्ये टाकून फेकून दिले. आता पर्यंत पोलिसांना फक्त धड़ मिळाले असून शरीराचे इतर तुकड्यांचा शोध घेत आहे.
मृतक स्वाती आणि महेंद्र रेड्डी या पती पत्नीत नेहमी वाद व्हायचा. या दोघांनीही आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन विवाह केला होता. दोघेही मेडिपल्लीतील बोडुप्पलस्थितच असून भाड्याने खोली घेऊन राहत होते. महेंद्र हा कॅब ड्रायव्हर म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करत होता.
कौटुंबिक कलह अन् भयानक कांड: घराशेजारी राहणाऱ्या शेजाऱ्यांना गर्भवती पत्नीच्या ओरडण्याचा आवाज आला असता, तिथले लोक पीडितेच्या घरात गेले, तेव्हा स्वातीचं शरीर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तसेच तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले होते. त्यानंतर तेच तुकडे एका बॅगेत भरून ठेवल्याचं चित्र दिसलं होतं. यानंतर घटनास्थळी असलेल्या लोकांनी संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पती महेंद्रला बेड्या ठोकल्या.
पतीनेच आपल्या पत्नीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याचा स्थानिकांना संशय आला होता. त्यानंतर तो मृतदेह एका पिशवीत ठेवून त्याची विल्हेवाट लावण्याची संधी शोधत होता. सध्या मृत महिलेच्या मेहुण्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील प्रकरणाचा तपास करत आहेत. एका आईच्या पोटात मुल वाढत असताना तिची हत्या करण्यात आली.

