संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- दिनांक २३ ऑगस्ट २०२५ ला राजुरा येथिल राणा वार्ड, माता मंदिर येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. या तान्हा पोळ्याला आजू बाजूचा वार्ड मधील ८० पेक्षा अधिक छोटे मुलं- मुली बाळ गोपाल उपस्थित होते, मागील ४ वर्षा पासून इथे पोळा साजरा करण्यात येत आहे. दिवसेंदिवस संख्या वाढत चाललेली दिसून आली.
तान्हा पोळ्या निमित्त सुरजभाऊ ठाकरे यांच्यातर्फे राणा वार्ड यासह राजुरा येथील नाका नंबर तीन येथील जय भवानी माता मंदिर तथा विविध ठिकाणी शालेय किट आणि चॉकलेट वाटप करण्यात आले, यावेळेस अभिजित धोटे, सुरज ठाकरे यांचे शुभचिंतक आशिष यमनुरवार, प्रा. यमनुरवार, राहुल चव्हान, दिलीप पोडे, राजू आवारी, विनायक कनकुलवार, आर्यन दुबे, बाबा मोहुर्ले, सुनील गादेवार, गोपाल राव, श्रीकांत लाड, प्रशांत लाड, आशीर्वाद चिंचळकर, अमोल ताठे, सुशील कल्लू्रवार, मंगेश मोहुर्ले, आनंद मोहरील, नवनीत घट्टरवार, सोनु सिंग, आकाश चिंचळकर, आकाश सावरकर, वाटेकर व मंगेश कोंडेकर आदी सहकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

