मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- इनर व्हील क्लबऑफ हिंगणघाट ने तुळसकर कॉलेजच्या गृहविज्ञान विभागाच्या सहकार्याने संस्कृती आणि आरोग्या प्रति जागरूकता यांचा मेळ घालणारा एक अनोखा कार्यक्रम साजरा केला. गणेश उत्सवाच्या निमित्ताने पारंपारिक चवी साजऱ्या करण्यासाठी मोदक बनवण्याची स्पर्धा आणि पौष्टिक सप्ताहाच्या निमित्ताने पौष्टिक आहार पाककृतींची स्पर्धा आयोजित केली ज्यात सहभागींना नाविन्यपूर्ण, निरोगी आणि संतुलित अन्न पर्यायांचा शोध घेण्यास प्रोत्साहित करणे हा उद्देश होता.
कारण आजच्या फास्ट फूड संस्कृती मध्ये आपली पारंपरिक खाद्य संस्कृती लोप पावत आहे. पारंपरिक खाद्य पदार्थ, त्यांच्या चवी, पोषण आणि स्वयंपाकातील सर्जनशीलतेला प्रोत्साहन देने आणि शिकण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करणे.
या कार्यक्रमाने केवळ उत्सवी स्वयंपाकाचा आनंद साजरा केला नाही तर दैनंदिन जेवणात पोषण समाविष्ट करण्याचे महत्त्व देखील अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेत नाविन्यपूर्ण ४ पाककृती करून चव, परंपरा आणि आरोग्याचे परिपूर्ण मिश्रण दाखवले, मोदकांचे वेगवेगळे प्रकार ज्यामुळे कार्यक्रमात पारंपरिक पदार्थ, पोषण आणि संस्कृती यांची सुंदर सांगड दिसून आली. सदर स्पर्धेमध्ये एकूण 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ज्यात उत्कृष्ठ पहिले तीन निवडून त्यांना पारितोषिक देण्यात आले. सदर कार्यक्रमात परीक्षक म्हणून क्लब अध्यक्ष कुमुद व्यास, सचिव सारिका डोंगरे व डॉ. रेखा नानोटकर उपस्थित होते. तुळसकर गृहविज्ञानाचे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.

