विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- एटापल्ली तालुक्यातील वनपट्टाधारक पात्र शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेला धान बोनस अद्याप मिळालेला नाही. बोनस मिळण्यात होणाऱ्या विलंबामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून आगामी हंगामातील शेतीकामासाठीही त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आदिवासी विकास महामंडळ, अहेरी येथील प्रादेशिक व्यवस्थापकांना निवेदन सादर केले. शासन निर्णयानुसार धान बोनसची रक्कम तात्काळ अदा करावी, अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शिवसेनेने इशारा दिला आहे की, धान बोनसची रक्कम ७ दिवसांच्या आत वितरीत न झाल्यास तालुक्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल व त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील. यावेळी निवेदन देताना अक्षय पुंगाटी शिवसेना तालुका प्रमुख एटापल्ली, नामदेव हिचामी शहर प्रमुख, प्रशांत तलांडे तालुका समन्वयक, विनोद मडावी तालुका संघटक, रुषभ दुर्गे युवासेना शाखा प्रमुख, मंगेश हिचामी, अनुज मिंज, राजु हिचामी, देवू वड्डे, नत्तू भाऊ दुर्वा, प्रवीण

