मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
*दि. 17/9/2025 ते मागणी पूर्ण होई पर्यंत*
अहेरी वृत – शासन आदिवासी बहूल क्षेत्रातील विद्यार्थीचे शैक्षणिक नूकसान व्हावी नाही म्हणून कंत्राटी शिक्षकांचे मानधान तत्वावर शिक्षक नियूक्ती केले परंतु त्यांना जे मानधान मिळणे अपेक्षित होते. ते सहा महिणे पूर्ण झाले तरी मानधान शिक्षकांना न मिळाल्यामूळे लेखी निवेदन जिल्हापरिषद गडचिरोली ला केले परंतु त्यावर जि. प. कडून काही प्रतिसाद मिळाले नाही शेवटी सर्व जिल्हातील कंत्राटी शिक्षकांनी काम बंद आंदोलन पूकारले आहे. एकूण सहा मूद्दे जो पर्यंत पूर्ण होणार नाही तो पर्यंत कामावर रूजू होणार नाही असे स्पष्ट भूमिका घेण्यात आले.1) शिक्षकांचे मानधान महीण्याच्या पाच तारीखे पर्यंत झाले पाहीजे 2) मार्च व एप्रिल चे मागील सत्राचे मानधान त्वरीत देण्यात यावे 3) चालू सत्रातील जून व चालू महीण्याचे मानधान दिवाळी पूर्व मिळणे 4 ) विमा सूरक्षा मिळणे 5) मागील सत्रातील वाढीव रक्कम 5000 हजार रूपये एरियस मिळणे 6) आदोलन कालावधीचे वेतन मिळणे. हे मूद्दे शासन स्तरावरून जो पर्यंत सूटनार नाही तो पर्यंत काम बंद आदोलन सूरू राहणार असे कंत्राटी शिक्षकांच्या वतीने सांगण्यात आले.

