संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील जिल्हा परिषदेमध्ये अभियंत्यांची चक्क शासकीय विश्रामगृहात दारूची ओली पार्टी रंगल्याच्या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. हे अभियंते दारू पार्टी करताना रंगेहाथ पकडले गेले आहे. शासकीय इमारतीमध्ये ही पार्टी रंगली होती. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. आम आदमी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही दारू पार्टी उघडतीस आणली आहे.
हे सहा अभियंते जिल्हा परिषदेच्या वसंत भवन या शासकीय विश्रामगृहात दारूची ओली पार्टी करीत असल्याची माहिती आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. मिळालेल्या माहिती वरून त्यांनी शासकीय वसंत भवनच्या खोली क्रमांक 107 मध्ये जाऊन पाहणी केली असता याठिकाणी जंगी दारु पार्टी रंगल्याचे दिसून आले. वसंत भवन ही वस्तू जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे निवासस्थान आहे. सरकारी मालमत्ता आहे. अशा शासकीय इमारतीत हे अभियंते दारू घश्यात रिचवत असल्याने दिसून आले.
त्यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा संपूर्ण प्रकार चंद्रपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सांगितला आणि घटनास्थळी येण्याची मागणी केली. मात्र त्यांनी व्हॉट्सॲपवर ही माहिती पाठवा, असे सांगत येते येणे टाळले, अशी माहिती आपच्या नेत्यांनी दिली. सध्या या घटनेची जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे.

