सीमा सुरूशे वाशिम जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- जिल्ह्यातील रिसोड येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येते श्रीमंत कुटुंबातील मुलाला लग्नाच्या नावाखाली फसवणूक करून दागिने आणि रोख रक्कम लंपास करणारी टोळीला जेरबंद करण्यात पोलिसाना यश आलं आहे. रिसोड येते लग्नाच्या पहिल्याच दिवशी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने नववधूने दागिने आणि रोख रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न केला. पण रिसोड पोलिसांनी या टोळीला अटक केले आहे. या प्रकरणी तीन महिला आणि एका पुरुषाला पोलिसांनी मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहे.
नेमकी काय आहे ही घटना? मागील काही दिवसांपासून राज्यात श्रीमंत कुटुंबातील लग्न करणाऱ्या मुलाला फसवणूक करून सोने आणि पैसे लुटणारी टोळी सक्रिय झाली आहे. ही टोळी आधी श्रीमंत मुलाला मुलगी दाखवत असे आणि पारंपरिक पद्धतीने लग्न लावून देत असे. लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी घरातील पैसे आणि दागिने घेऊन फरार होत असे. अशा पद्धतीने महाराष्ट्र सह मध्यप्रदेशात राजस्थान भागात अनेक कुटुंबांची फसवणूक करण्यात ही टोळी सक्रिय होती.
पोलिसांनी या टोळीला जेरबंद करत 40 हजार रुपयांचे दागिने आणि तब्बल 1 लाख 25 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणी रिसोड पोलीस अधिकचा तपास करत असून या प्रकरणात आणखी काही आरोपींसह मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

