मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे समर्थनार्थ भन्ते विनाचार्य यांचे मुख्य मार्गदर्शनात हिंगणघाट येथे धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळे हिंगणघाट शहर आणि तालुक्यातुन हजारो आंबेडकरी समाजातील महिला पुरुष यांनी सहभाग घेतला.
दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या मुक्ती आंदोलन साठी हिंगणघाट शहरामध्ये धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे मुख्य अनिल जवादे यांचे नेतृत्वात व रॅलीचे नियोजन विजय तामगाडगे, विकास शाक्य, विनय शंभरकर, राजू मेश्राम, सोनू गेडाम, देवा कोल्हेकर, मनोज सावंत, शिपी, जॉनी दुर्गे, सुरेंद्रकुमार टेंभुर्णे, सोनू गवळी, विक्रांत भगत, विक्की वाघमारे, मयूर पाटील, मार्शल मयूर धाबर्ड, बबीताई वाघमारे, वसंति देवगडे, प्रमोदिनी नगराळे, तेजस्विनी पाटील, हेमलता खैरकर, अनिता गोरख भगत, भारती मानकर, यांचा होता या बाळा मानकर यानी डॉ.बी. आर.आंबेडकर शाळें समोर पाणी व बिस्किट चे वाटप रेलीतील उपासकांना केले. यावेळी हिंगणघाट शहरात धम्ममय वातावरण निर्माण झाले. व अनिन जवादे यानी लोकांना नवी दिल्ली ला 12 फेब्रुवारी 2026 ला जाण्यासाठी संपर्क करण्याचे संगितले.

