माजी जि. पं. अध्यक्षा भाग्यश्रीताई हलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक अमोल मुक्कावार यांचा भीक मांगो आंदोलन.
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
*अहेरी ==*
प्राणहिता ते अहेरी व अहेरी मुख्यचौक ते गडअहेरी या रस्त्यांचे काम मागील दोन ते अडीच वर्ष्यापासून अगदी कासव गतीने काम सुरु आहे. या कामाचे गती वाढवावी म्हणून या पुर्वी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ,विद्यामान सिनेट सदस्या मा.भाग्यश्रीताई आत्राम ( हलगेकर )यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी चे नगरसेवक अमोलभाऊ मुक्कावार यांनी आमरण उपोषण केले होते, व भाग्यश्री ताई आत्राम यांनी आंदोलन केले असता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित कंत्राटदारांनी भाग्यश्रीताई व अमोलभाऊ यांना 2 महिण्यात काम पुर्ण करण्याची लेखी स्वरुपात आश्वासन दिले होते परंतु आज पर्यंत कसलीही कामात सुधारणा न केल्यामुळे शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मा.भाग्यश्री ताई आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक अमोलभाऊ यांच्या नेतृत्वाने भिक मांगो आंदोलन करण्यात आले या वेळी अहेरी राजनगरीत भिक मागून जमलेल्या रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाला सुपुर्द करण्यात आले आहे.या वेळी श्रीनिवास विरगोनवार,श्रीनिवास चटारे,स्वप्नील श्रीरामवार, अप्सरभाई,अब्दुल रहेमान,सुमित मोतकुरवार,मिलिंद अलोने,व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पदअधिकारी व नागरीक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

