Wednesday, April 22, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

राजाराम आरोग्य पथकाची रुग्णवाहिका कमलापूरला; नागरिक संतप्त.

Madhukar gongale by Madhukar gongale
October 24, 2025
in Uncategorized
0 0
0
राजाराम आरोग्य पथकाची रुग्णवाहिका कमलापूरला; नागरिक संतप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आरोग्य सेवेसाठी रुग्णांना तासन्‌तास प्रतीक्षा – रस्त्याची दुरवस्था आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाकडे बोट

मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.

*अहेरी==*

राजाराम :
राजाराम आरोग्य पथकासाठी शासनाकडून मंजूर झालेली रुग्णवाहिका सध्या कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात वापरली जात असल्यामुळे राजाराम परिसरातील नागरिकांना तातडीच्या आरोग्य सेवेसाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, कमलापूरकडे स्वतःची रुग्णवाहिका असतानाही राजारामची रुग्णवाहिका तिथेच वापरली जात असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे.

राजाराम आरोग्य पथकाच्या हद्दीतील नागरिकांना जेव्हा आरोग्य सेवांची आवश्यकता भासते, तेव्हा त्यांना कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून राहावे लागते. “कमलापूरची रुग्णवाहिका दुरुस्तीला गेली आहे” असे तोंडी उत्तर दिले जाते, मात्र यासंदर्भात कोणताही लेखी आदेश उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांचा रोष आणखीनच वाढला आहे.

दरम्यान, राजाराम ते कमलापूर हे अंतर सुमारे १० ते १२ किलोमीटर असून, रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रुग्णवाहिकेला हे अंतर कापण्यासाठी जवळपास एक तास वेळ लागतो. त्यामुळे अनेकदा गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत आणि त्यांची स्थिती अधिकच गंभीर बनते. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका मिळेपर्यंत राजाराम येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना तणावाचा सामना करावा लागत आहे.

या गंभीर परिस्थितीमुळे राजाराम परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे की – राजाराम आरोग्य पथकासाठी मंजूर झालेली रुग्णवाहिका मूळ ठिकाणी मुक्कामी ठेवण्यात यावी आणि आवश्यकतेनुसार इतरत्र पाठवावी.

या प्रश्नावर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे आता संपूर्ण राजाराम व परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

आलापल्ली येथे लखमाई भुलाई मातेचे प्रतिष्ठापणा कार्यक्रम ताथामाठात संपन्न.

Next Post

काँग्रेस पक्षात पुन्हा नव चैतन्य निर्माण करण्याला माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपवावा. = सुरेश श्रीवासकर यांची पत्रकातून मागणी.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
काँग्रेस पक्षात पुन्हा नव चैतन्य निर्माण करण्याला माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपवावा. = सुरेश श्रीवासकर यांची पत्रकातून मागणी.

काँग्रेस पक्षात पुन्हा नव चैतन्य निर्माण करण्याला माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपवावा. = सुरेश श्रीवासकर यांची पत्रकातून मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In