- आदर्श शाळेत वन्यजीव सप्ताह साजरा.
- वनपरिक्षेत्र सामाजिक वनीकरण राजुरा चा पुढाकार
संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
राजुरा:- पृथ्वीवर प्रचंड जैवविविधता आहे. परंतु जंगलतोड, वाढते शहरीकरण, पशु-पक्षांच्या अधीवासांवर मानवी आक्रमण यासारख्या बाबींमुळे हल्ली मानवाचा जंगली प्राण्यांशी संबंधच येत नाही आणि येतो तो दोन्ही बाजूंना फारसा आनंददायी नसतो ही परिस्थिती बदलण्यासाठी चे प्रयत्न या सप्ताहाच्या निमित्ताने होत आहे. मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता वन्यजीव सप्ताहाची अंमलबजावणी करा असे आवाहन सामाजिक वनिकरण वनपरीक्षेत्र राजुरा च्या शोभा उपलवार, वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले. तर प्रमुख अतिथी म्हणून विलास कुंदोजवार, वनपाल, एस.बी. ताकसांडे, वनरक्षक, आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर, राष्ट्रीय हरित सेना विद्यार्थी प्रमुख साहिल नंदिगमवार, राधिका चेडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांनी केले. आभार प्रदर्शन विलास कुंदोजवार, वनपाल यांनी केले.
वन्यजीव सप्ताहची मूळ संकल्पना व सुरुवात याविषयीची माहिती राधिका चेडे या विध्यार्थीनी ने सांगितली. वन्यजीव सप्ताहची अधिक माहिती शिवानी मसे हिने तर वन्यजीव सप्ताहानिमित्त आपण काय करू शकतो यावर नयना जंजीलवार या विध्यार्थीनी विचार व्यक्त केले.नलिनी पिंगे, एस. बी. ताकसांडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

