मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी ग्रहमंत्री अनिलजी देशमुख साहेब, खासदार अमरभाऊ काळे, वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत हिंगणघाट शहरातील माजी नगरसेवक, समाजसेवकांसह दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर भव्य प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.
हिंगणघाट शहरातील समाजसेवक आणि तरुण वर्ग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर विश्वास दाखवत पक्षात प्रवेश करीत आहेत. पक्षाच्या विचारसरणीवर आणि लोकाभिमुख कामगिरीवर जनतेचा विश्वास वाढत आहे. या नव्या कार्यकर्त्यांच्या आगमनामुळे पक्षाचे वर्धा जिल्ह्यात संघटन अधिक बळकट होईल असे माजी ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शुभांगी डोंगरे माजी नगरसेविका, सुनिलभाऊ डोंगरे समाजसेवक, गौतम कोठारी समाजसेवक, चंदाताई कोठारी, जितू कुकसे माजी न. पा. उपाध्यक्ष, गुड्डू शर्मा माजी न. पा. उपाध्यक्ष, आशिष देवतळे माजी नगरसेवक सिंदी रेल्वे, दिनेश उर्फ दादा देशकरी माजी नगरसेवक, अनिल बुलानी, सुनिल भोमले माजी नगरसेवक सिंदी रेल्वे, संजय नेहरोत्रा सेवानिवृत्त शिक्षक, किरण चौहान, गुणवंता कारवटकर, नाना पुंड, अमोल वाघमारे, अमोल हरडे, मन्नू मकरे आदिनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. सर्व नव्या सदस्यांना पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात स्वागत करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे पक्ष केवळ राजकीय कार्यासाठी नव्हे, तर समाजाच्या उन्नतीसाठी देखील कटिबद्ध आहे. समाजातील विविध स्तरातील व्यक्तींचा प्रवेश हे पक्षाच्या धोरणाच्या प्रभावीतेचे प्रतीक आहे. नव्या कार्यकर्त्यांच्या सामील होण्यामुळे पक्ष संघटन अधिक बळकट होईल आणि नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले जाईल. असे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी सांगितले.
पक्षाच्या आगामी योजना, विकास प्रकल्प आणि सामाजिक कार्यक्रमांविषयी माहिती दिली. त्याच बरोबर नव्या सदस्यांनी स्थानिक आणि सामाजिक समस्यांवर लक्ष देण्याचे आश्वासन दिले.“पक्षाच्या धोरणांनुसार प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. नव्या सदस्यांच्या योगदानामुळे स्थानिक समाजातील विकासकामे, सामाजिक उपक्रम आणि जनहित योजना अधिक प्रभावी होतील. पक्षाच्या कार्यात सक्रिय सहभाग आणि एकत्रित प्रयत्न हेच भविष्य घडवू शकतात.” असे खासदार अमर काळे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला पक्षाचे जेष्ठ नेते सुनिल राऊत, जेष्ठ नेते बबनराव हिंगणेकर, तालूका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, मोहम्मद रफिक, सुधाकर खेडकर, सिंदी रेल्वे शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, माजी नगराध्यक्षा सुनीता कलोडे, प्रवीण श्रीवास्तव, युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, जिल्हा सचिव श्रीकांत भगत यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

