अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- तालुक्यातील जीटीएन टेक्सटाइल प्रायव्हेट लिमिटेडच्या कामगारांमध्ये त्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना योग प्राणायाम आणि आसनांचे ज्ञान देण्यासाठी सुसज्ज करण्यासाठी, जेणेकरून ते बदलत्या हवामानात वाढत्या संसर्गापासून सुरक्षित आणि निरोगी राहू शकतील. कंपनी व्यवस्थापन दरवर्षी सर्व कामगारांसाठी नियमितपणे अशा ११ एक दिवसीय विशेष प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करते.
या एक दिवसीय प्रशिक्षण सत्रात योग, प्राणायाम, अग्निशमन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे सामान्य ज्ञान समाविष्ट आहे. या प्रशिक्षण सत्राची सुरुवात पतंजली योग पीठ हरिद्वार येथुन प्रशिक्षित वरिष्ठ योग शिक्षक किशोर धुंडेले यांनी हस्ते करण्यात आले योग प्राणायाम सत्रात भस्त्रिका, कपालभाती, बाह्य प्राणायाम, अनुलोम विलोम, भ्रामरी, उद्गीथ, प्राणव ज्ञान इत्यादी प्राणायाम व्यायामांसह योगिंग जाँगीग, सूक्ष्म व्यायाम. ताडासन, वु्क्षासन, त्रिकोणासन, वज्रासन, मंडुकासन, सूर्यनमस्कार इत्यादी व्यायामांसोबतच कामगारांना आहाराविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आणि त्यांना त्यांचे शरीर रोगमुक्त ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांसोबत नियमितपणे ते करण्याचा सल्ला देण्यात आला. विकास मारबते यांनी अग्निशमनाबद्दल माहिती दिली, डॉ. स्वाती पडोळे यांनी आरोग्य आणि दैनंदिन दिनचर्येबद्दल माहिती दिली आणि कंपनीचे एचआर मॅनेजर महंत यांनी गुणवत्ता आणि सुरक्षिततेबद्दल माहिती दिली.
जीटीएन टेक्सटाईल्स प्रायव्हेट लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष हेमंत मिटकर, एचआर मॅनेजर सुरेंद्र महंत, ललित बाबुरे, रवींद्र कुथे, वाघमारे, धोटे, मारबते, ट्रेनिंग जाँबर सुनील कमाले इत्यादी कामगारांच्या प्रशिक्षण सत्राच्या यशस्वीते करीता परिश्रम करत आहेत.

