मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809
अहेरी तालुक्यातील *छल्लेवाडा* येथील रहिवासी श्री.अनिल मालय्या दुर्गे यांची आई मल्लूबाई दुर्गे यांची दुःखद निधन झाले होते.अनिल दुर्गे यांच्या परिवार अंत्यत गरीब असून अंत्यविधी कार्यक्रमातुन कसेबसे बाहेर पडले.
पण समोर होणाऱ्या तेरवी कार्यक्रमाला दुर्गे परिवाराला आर्थिक अडचण भासत होती.आज अनिल दुर्गे यांनी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष *अजयभाऊ कंकडालवार* यांच्या अहेरी जनसंपर्क कार्यालय येथे कंकडालवार यांची भेट घेऊन त्यांची आर्थिक अडचण बाबत सांगितले होते.कंकडालवार यांनी दुर्गे कुटुंबाची अडचण बघून तेरवी कार्यक्रमाला आर्थिक मदत केली.आर्थिक मदत मिळाल्याने दुर्गे कुटुंबातील नातेवाईक व सदस्याचे चेहऱ्यावर आनंदाची वातावरण दिसून आले.तसेच *कंकडालवार* यांचे आभार मानले.
यावेळी विलास बोरकर,गुलाब देवगडे,प्रभाकर दुर्गे,शंकर भसरकर,दिलीप दुर्गे,हणमंतु ठाकरे,करण कांबळे,दासू कांबळे,तेजराव दुर्गे,नवीन जनगम, अनमोल बोरकर जगदीश कोंडागुर्ले यांच्यासह आदी उपस्थित होते.

