पुराच्या पाण्याने जमीनी गेल्या खरडून व पिके झाली नष्ट.
अक्षय पेटकर वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
हिंगणघाट:- ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या शेताचा सर्वे करून हेक्टरी ५०,००० हजार रुपयाची आर्थिक मदत सरकार तर्फे देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नरेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे.
मागील १८ ते २० दिवसापासून सुरू असलेल्या सतत पावसामुळे सर्व भागातील नदी नाले ओसंडून वाहत असून काठच्या जमिनी पुराच्या पाण्याने खरडून गेल्या आहे. तसेच पुराच्या पाण्याने शेतातील पिके नष्ट झालेली आहे. खरिपाच्या हंगामात मृग नक्षत्रात पाण्याच्या लपंडावाने शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीचा सामना करावा लागला. पेरणीची वतर न जमल्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले असताना सुद्धा कापूस, सोयाबीन, तूर इत्यादी पिकांची लागवड केली असे असताना जुलै महिन्याच्या सुरुवातीला १८ ते २० दिवसापासून सतत धार पावसामुळे सर्व नदी नाले ओसंडून पाहू लागले. पुराच्या पाण्याने गाव खेड्यात घरामध्ये पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी असल्यामुळे सर्व पिके नुसतेनाभूत झाली असून जळाली आहे पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांच्या शेतातील जमीन खरडून निघाली असून माती वाहून गेली आहे. नदी नाल्याच्या पुराचे पाणी गावात आल्यामुळे घरे बुडाली असून ग्रामस्थांना दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागले. तसेच जीवनावश्यक वस्तू पुराच्या पाण्या सडून गेल्या आहेत. तसेच पुराच्या वेठ्याने गावातील घरे जमीनदोस्त झाली असून जनावरांचा चारा(कुटार) ओला झाला असून सडला आहे.
सभोवतालची वर्धा नदी, वना नदी, पोतरा डॅम, लाल नाला प्रकल्प, नांद धरण, वडगाव धरण धुईथड्या भरून ओसंडून वाहत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अजनसरा, हिवरा, बोपापुर, पोहणा, येरला, ढिवरी-पिपरी, धानोरा, शेकापूर, टाकळी, निधा, मनसावळी, कानोली, कात्री, शिरसगाव, लाडकी, चिंचोली, सावंगी (संगम), पारडी, सावंगी (खारडी), टेंभा, दोंदुडा, बांबर्डा, वाघोली, वेळा, काजळसरा, नरसाळा, वणी, सिरुड, नांदगाव, पिंपळगांव, रिमडोह, शहालगडी, कान्हापुर, बोरगांव, बोरखेडी, दाभा, इंझाळा, अजंती, कोल्ही, डाग, इत्यादी गाव पुराच्या वेठयाने घेतली असून शेतातील पिके नष्ट झाली आहे. घरे पडुन प्रचंड नुकसान झाल आहे.
दि. १२/७/२२ पासून नांद धरणाचे ७ व वडगांव धरणांचे ५ दरवाजेयाने पाण्याचा विसर्ग सारखा सुरू होत. दि. १३/७/२२ ला नांद धरणाचे १९ व वडगाव धरणाचे ११ दरवाजे दि १४/७/२२ ला नांद धरणाचे ०२ व वडगाव धरणाचे १९ दरवाजे, दि १५/०७/२२ला नांद धरणाचे ०५ वडगाव धरणाचे ०७ दरवाजे,दि १६/०७/२२ला नांद धरणाचे ०२ व वडगाव धरणाचे ०२ दरवाजे,दि १७/७/२२ ला नांद धरणाचे ०२ व वडगाव धरणाचे ०२ दरवाजे,दि १८/७/२२ ला नांद धरणाचे ०७ व वडगाव धरणाचे १९ दरवाजे उघडे करून पाण्याचा विसर्ग सुरू होता वर्धा नदीवरील निम्न वर्धा धरणाचे दरवाजे सतत उघडून पाण्याच्या विसर्गामुळे दुथडीच्या बाहेर पाणी फेकून वाहत आहे. त्यामुळे नदी नाल्याच्या पुराच्या पाण्याने भयानक रूप धारण केल्यामुळे शेतातील पिके नष्ट झाली.
तरी दुबार तिबार पेरणीचा सामना केल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पुराच्या पाण्याने नष्ट झाली आहे तरी सरकारने त्वरित सर्वे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदना द्वारे केली आहे.