मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
वर्धा :- फिर्यादी श्रीमती रजनी राजु पाटील, रा. नविन क्वार्टर, मदनी, ता. जि. वर्धा ह्या दिनांक २५ जुलै रोजी त्यांचेजवळ असलेल्या सोन्याच्या दोन्ही पोत व चांदीचे ब्रासलेट एका लहान पर्समध्ये ठेवून ती पर्स त्यांचे जवळील हॅन्ड बॅगमध्ये ठेवली व ऑटो रिक्षाने मदनीवरून वर्धा करीता करीता निघाल्या. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ऑटो रिक्षा महिला आश्रम येथे पोहचला असता, दोन महिला या महिला आश्रम येथुन फिर्यादी बसुन असलेल्या ऑटो रिक्षात बसल्या व ऑटो रिक्षा दुपारी ०१.१५ वा. बस स्टॅन्ड समोरील ऑटो स्टॅन्ड येथे पोहचला. फिर्यादी व त्या दोन्ही महिला खाली उरतल्या व त्या दोन्ही महिला तेथुन निघुन गेल्या. त्यानंतर काही वेळाने फिर्यादी यांनी त्यांची हॅन्ड पर्स मधील छोटी पर्स पाहिली असता, त्यांना त्यांचे हॅन्ड पर्सची चैन उघडी दिसली व त्यातील छोटी पर्स दिसुन आली नाही. ॲटो रिक्षाचे आजु बाजुला पर्सचा शोध घेतला मिळुन आली नाही. तेव्हा त्याचे लक्षात आले की, ऑटो रिक्षा मध्ये महिला आश्रम येथुन बसलेल्या दोन महिलांनीच त्याचे छोटया पर्स मध्ये ठेवलेल्या दोन सोन्याच्या पोत वजन अंदाजे १९.५ ग्राम किंमत ५७,५००/- रू. व एक चांदीचे कडयाचे ब्रासलेट वजन ७.५ तोळे किंमत ३५००/- रू. असा एकुण जुमला किंमत ६१,०००/- रू. चा माल सदर दोन महिलांनी चोरी केल्याबाबत पो.स्टे. वर्धा शहर येथे दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून अप. क्र. १०६९/२०२२ कलम ३७९ भांदवि अन्वये नोंद करण्यात आला.
सदर गुन्हा तपासावर असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या माहितीवरून सदर गुन्हयातील महिला आरोपी नामे १) श्रीमती माला रविंद्र खंडारे, वय ४५ वर्ष, रा. चितोडा रोड, लाला लचपतराव शाळेजवळ, पुलफैल, वर्धा, २) वनिता उर्फ हिमानी मंगल हातागडे, वय २६ वर्ष, रा. अशोक नगर, वर्धा यांना सराफ लाईन वर्धा येथुन ताब्यात घेवून त्याचे ताब्यातुन सदर गुन्ह्यातील चोरी गेलेला संपुर्ण मुद्देमाल १) दोन सोन्याच्या पोत वजन अंदाजे ११.५ ग्राम किंमत ५७,०००/- रू व एक चांदीचे कड्याचे ब्रासलेट वजन ७.५ तोळे किंमत ३५००/- रू. चे असा एकुण जुमला किमत ६१,०००/- रू. चा माल हस्तगत करून वर नमूद गुन्हा उघडकीस आणला. तसचे महिला आरोपी नामे मोनिका उर्फ मोनी लखन शेंडे, रा. अशोक नगर, वर्धा हिचे ताब्यातुन
पो.स्टे. वर्धा शहर अप.क्र. ६४९/२०२२ कलम ३७९ भांदवि मधील चोरी गेलेल्या रकमे पैकी नगदी ३७९०/- रू. माल हस्तगत करून सदरचा गुन्हा सुध्दा उघडकीस आणण्यात आला.
सदरची कार्यवाही वर्धा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांचे निर्देशानुसार पोउपनि. प्रविण पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार सचिन इंगोले, नितीन रायलकर, दिवाकर परिमळ, सुभाष घावड, दिपक जंगले, प्रशांत बावणरकर, राजेंद्र ढगे, राहुल भोयर, पवण निलेकर, राजु तांभारे व महिला पोलीस अंमलदार सोनम कांबळे यांनी केली.