मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील आर एस बिडकर महाविद्यालय (RTM नागपूर विद्यापीठ) चा जूदो खेळाडू स्मित राजू श्रावणे यांची ५ वे खेळो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये सहभागासाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा २५ ते २८ नोव्हेंबर 2025 दरम्यान उदयपूर, राजस्थान येथे होणार आहे.
फेब्रुवारी 2025 मध्ये अमृतसर, पंजाब येथे झालेल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी जूदो स्पर्धेत स्मित यांनी प्रभावी कामगिरी करत टॉप ८ मध्ये स्थान मिळवले. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांची राष्ट्रीय स्तरावरील खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी निवड निश्चित झाली.
स्मित आर एस बिडकर कॉलेज आणि नागपूर विद्यापीठतर्फे स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार असले, तरी ते नियमित सराव ॲमेच्यूअर जूदो असोसिएशन वर्धा –हिंगणघाट येथे करतात. या संघटनेचे सचिव विठ्ठलरावजी आवचट यांचे त्यांना सतत मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळते.
स्मित सध्या एम. ए सोसलॉजी द्वितीय वर्ष शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयाचे क्रीडा प्राध्यापक डॉ. राजुभाऊ अवचट, तसेच प्रशिक्षक सुबोध महाबुधे आणि विशाल कस्तुरे यांच्या प्रशिक्षणाखाली त्यांनी सातत्यपूर्ण मेहनत व प्रगती साधली आहे. आपल्या जिद्दी, शिस्त आणि कठोर परिश्रमामुळे स्मित श्रावणे यांनी हिंगणघाट शहर, आर. एस. बिडकर कॉलेज आणि राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांचा अभिमान राष्ट्रीय स्तरावर वाढवला आहे.

