मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
जिमलगट्टा – रसपल्लीबिट न. क्र 2 येतील शेतकऱ्यांचे दिनांक 09 तारखेला जंगलात चराई साठी बकऱ्याची कडप गेला असता त्या दिवशी कडपातून काही बकरे गायब झाले, दुसऱ्या दिवशी गुराखी तसेच बकऱ्यांचे मालक जंगलात शोध घेतला असता कम्पर्टमेन्ट नंबर 344 मध्ये पहाडीवर एकूण 31 बकरे मृता अवस्थेत दिसून आलेत . वाघानी बकऱ्या वर हल्ला केलेला दिसून आला. एकूण रसपली येतील एकूण 46 बकरे वाघाच्या हल्यात ठार झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वाघाच्या दहशत्ती मुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रसपली येतील पोच्या अंका दहागावकर यांचे (13),अशोक मदना दुर्गे (5),वेंकटेश राजा बोरकूट (6), सुरेश नानाजी दुर्गे (5), बापू मालिग्या दुर्गे (3),शिवराम नानाजी दुर्गे (2),बापू किष्टा दुरके (9)नामदेव मदना दुर्गे (3), असे एकूण 46 बकरे वाघाच्या हल्यात ठार झाले असून वन विभाग कडून चौकशी, पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

