विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. नं.9421856931
*एटापल्ली ==*
पंचायत समिती एटापल्ली अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनेच्या शाळांच्या विद्यार्थ्याकरिता तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि. 29/12/25 ते 30/12/25 रोजी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय एटापल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. सदर विज्ञान प्रदर्शनीत भगवंतराव माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळा एटापल्ली येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रतिकृती सादर करीत तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. मुख्य विषय उद्योनमुख तंत्रज्ञान आणि समाजाची गरज अंतर्गत पूर आपत्तीसाठी योग्य नियोजन आणि त्याबद्दलची अंमलबजावणी करण्यासाठी आणि तसेच एकूणच जिवीतहानी आणि वित्तहानी कमी करण्याकरिता उपाययोजना हा उपविषय घेऊन माध्यमिक खुल्या गटातून उत्कृष्ट अशी प्रतिकृती सादर करत तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. सौ. ममता सुनिल झिलपे माध्यमिक शिक्षिका यांच्या मार्गदर्शनाखाली सुरज समरू तलांडे आणि जतीन निर्मल मिस्त्री वर्ग 10 वी चे विद्यार्थी यांनी प्रतिकृती तयार करीत सादर केली होती. दरवर्षी प्रमाणे याही शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांनी अव्वल स्थान प्राप्त केल्याने सर्वच स्तरावरून विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षिका यांचे कौतुक तथा अभिनंदन केले जात आहे. तसेच जतीन निर्मल मिस्त्री आणि गट यांनी प्रश्न मंजुषा कार्यक्रमात तालुक्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून त्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
सदर प्राविण्याबद्दल भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरी चे आदरणीय सचिव साहेब माननीय डाँ. श्री. धर्मरावबाबा आत्राम साहेब तसेच माननीय अध्यक्ष सौ. भाग्यश्रीताई ऋतुरा�

