Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

हिंगणघाट तालुक्यातील सेलू मुरपाड शिवारात पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 1, 2026
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट तालुक्यातील सेलू मुरपाड शिवारात पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

शेतात आढळले वाघाचे केस आणि रक्त. मात्र वाघाचा मृतदेह आढळला कॅनल मध्ये. शेत शिवारात लाऊन असलेल्या विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा अंदाज.


मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील सेलू मुरपाड शिवारात पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेतकरी हरभरा व तुरीच्या पिकांचे जंगली प्राण्यापासून रक्षण करण्यासाठी या भागात शेतात विद्युत करंट लाऊन ठेवलेला असतो. या वाघाचा मृत्यू विद्युत प्रवाहाने झाल्याच्या प्राथमिक अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यावर गुन्हा देखील दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र शेतकरी वर्गातून या भागातील वनविभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा असं बोलले जात आहे.

जर या भागात वाघ होता तर शेतकऱ्यांना शेतात विद्युत प्रवाह लावू नये याबाबत सूचना न दिल्याने कर्तुत्वात कसूर झालेल्या संबंधित महसूल विभागाच्या अधिकाऱ्यावर या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी मुरबाड या गावातील शेतकरी करीत आहे.

हिंगणघाट तालुक्यातील शेलु मुरबाड शिवारात कॅनलच्या पाण्यामध्ये मृत वाघ आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. मागील अनेक दिवसांपासून हिंगणघाट शहरांमध्ये वाघाच्या दहशतीच्या अनेक अफवा पसरत असताना आता ही देखील अफवा असू शकते यामुळे ही अफवा आहे की सत्य आहे हे जाणून घेण्यासाठी म्हणून वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी गेले असता. कॅनलच्या पाण्यामध्ये एक अडीच ते तीन वर्षाचा वाघ मृत अवस्थेत आढळून आला. गावातील नागरिकांकडून याबाबत माहिती मिळताच हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते. सध्या शेतात हरभरा व तुरीचे पीक असल्याने जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विद्युत प्रवाह असलेल्या तारा लावलेल्या आहेत. घटनास्थळाच्या शेजारीच एका शेतामध्ये अशाच पद्धतीच्या विद्युत तारा लावून असल्याबाबत माहिती मिळाली असून या शेतात वाघाच्या पायाचे ठसे , वाघाचं रक्त, व वाघाचे केस मिळून आल्याने तसेच हा वाघ शेतातून ओढत आणून या कॅनल मध्ये टाकले असल्याचे आढळून येत असल्याने वनविभागामार्फत तपास केला जात आहे. तत्पूर्वी दोराच्या सहाय्याने वाघाला बाहेर काढण्यात आले वाघाचे शौ-विच्छेदन केल्या जात असून वाघाचा मृत्यू कशाने झाला हे शवविच्छेदन अहवालाने स्पष्ट होईल.

Tags: #वाघाचा मृत्यू#हिंगणघाट तालुक्यातील सेलू मुरपाड शिवारात पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ.Hinganghat
Previous Post

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत भगवंतराव आश्रमशाळेचे विद्यार्थी अव्वल प्राप्त केला तालुक्यातून प्रथम क्रमांक.

Next Post

अल्लीपुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोहा दारू निर्मीती करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अल्लीपुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोहा दारू निर्मीती करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही.

अल्लीपुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोहा दारू निर्मीती करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In