जिल्हाधिकारी श्री अविशांत जी पंडा यांचा स्तुत्यव न्याय पुर्ण उपक्रम.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*गडचिरोली, दि. १* :
*नक्षलवादामुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी व त्यांच्या सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाने नववर्षाच्या सुरुवातीलाच एक महत्त्वपूर्ण निर्णय अंमलात आणला आहे.कर्तव्यदक्ष, न्यायप्रीय, जिल्हाधिकारी श्री अविश्यांत जी पंडा यांच्या पुढाकारातून नक्षलपीडित कुटुंबातील २९ तरुणांना शासनसेवेत सामावून घेत जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत शिपाई पदावर नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. या निर्णयामुळे अनेक कुटुंबांच्या जीवनात स्थैर्य आणि आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे*
*श्री देवा भाउ मुख्यमंत्री, पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात न्यायापासुन कोन्हिही वंचीत राहु नये, सर्वांना समान न्याय देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी श्री अविशांत जी पंडा गेली एक वर्ष अतिशय उत्तम कार्य करीत आहेत.त्याच्या न्याय देणा-या या सेवा उपक्रमाचे गडचिरोली जिल्हा वासीयान तर्फ श्री प्रकाश गेडाम,मा सिनेट सदस्य रातुम नागपूर विद्यापीठ तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मित्र महाराष्ट्र यांनी अभिनंदन केले आहे*

