मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय *आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ. धर्मरावबाबा* *आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.पद्माताई सतीश बोगे महिला व बालकल्याण सभापती* *नगर पंचायत सिरोंचा* यांच्या वतीने *नगरसेवक सतीश भोगे* यांच्या संकल्पनेतून एमपीएससी, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षा तथा सरळ सेवा भरती परीक्षांचे पुस्तके सिरोंचा येथील *वसुंधरा वाचनालय* येथे विध्यार्थी व विध्यार्थीनांना *मोफत* वाटप करण्यात आली.
ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा अधिकारी व्हावेत शिक्षणात त्यांची प्रगती व्हावी या उद्देशाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसांठी स्पर्धा परीक्षेची पुस्तके, टेबल खुर्च्या,चार्जिंग लाईट,व इतर वस्तू वसुंधरा वाचनालयातील विध्यार्थ्यांना सुपूर्द करण्यात आली. ही पुस्तके विद्यार्थ्यांना वाचनालयात उपलब्ध होतील व ते वाचनालयात बसून अभ्यास करू शकतील.असे मत *नगरसेवक सतीश भोगे यांनी व्यक्त केली.*
या प्रसंगी *राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम,नगरसेवक जगदीश रालाबंडीवार,नगरसेवक सतीश भोगे, नगरसेवक सतीश राचर्लावार,सत्यम पिडगू,राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिट्यालासह स्पर्धा परीक्षेत सहभागी विध्यार्थी व विध्यार्थिनी* मोठया संख्येने उपस्थित होते.

