विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी क्र. 9421856931
सन २०२५ या वर्षात आतापर्यंत एटापल्ली पोलीस स्टेशन कडून शोध घेतलेले एकूण ८४०००/- रुपये किंमतीचे मोबाईल फोन संबधित तक्रारदारांना सुपूर्द
आजकाल तरुणपिढी मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करीत असून मोबाईल हाताळतांन तसेच प्रवासादरम्यान मोबाईल हरविल्यानंतर किंवा चोरीस गेल्यानंतर सदरची तक्रारी संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली जाते. याबाबत पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल सा. यांचेकडून सायबर अपराध व मोबाईल चोरीच्या गुन्हयांबाबत सतर्क राहून तात्काळ कार्यावाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. शासना कडुन पुरविण्यात आलेले CEIR पोर्टलच्या माध्यमाने व तांत्रिक कौशल्याच्या आधारे सदर चोरीस गेलेले व तसेच हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला जाता असतो.
मोबाईल हरवला किंवा चोरीस गेल्यास सदर मोबाईलद्वारे ऑनलाईन गुन्हे घडण्याची जास्त शक्यता असल्यामुळे हरवला किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक असते. या बाबींचा विचार करुन एटापल्ली पोलीस स्टेशन मार्फत तांत्रीक कौशल्याचा वापर करुन हरवलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध लवकरात लवकर घेण्यात येते असतो.
माहे जुलै २०२५ ते आतापर्यंतच्या कालावधीत CEIR पोर्टलच्या माध्यमाने व तांत्रिक कौशल्याच्या वापर करुन एकूण ८४०००/- रुपये किंमतीच्या हरवलेले व चोरीला गेलेले ०५ मोबाईलचा एटापल्ली पोलीस स्टेशनच्या मार्फतीने शोध घेण्यात आलेला असून, पोलीस रेझींग डे निमित्त आजदिनाक ०५/०१/२०२५ रोजी सर्व मोबाईला संबंधित तक्रारदारांना पोलीस स्टेशन एटापल्ली येथे साहायक पोलीस निरीक्षक श्री. मोतीराम मडावी यांचे हस्ते सुपूर्द करण्यात आले आहे.
कार्यक्रम प्रसंगी �

