मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*अहेरी ==*
स्पार्कलेफ फॉउंडेशन च्या वतीने आज उपजिल्हा रुग्णालय, अहेरी येथे एक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. हा कार्यक्रम स्पार्कलेफ फॉउंडेशन चे संस्थापक संपत दुर्गे आणि मॅनेजिंग डायरेक्टर उमेश रत्नम यांच्या मार्गदर्शनाखाली विकास भाऊ ठाकरे यांनी आयोजित केला. या उपक्रमांतर्गत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी फळांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम विकास भाऊ ठाकरे यांच्या सोबत सुनील गुरनुले, राज शेंडे, प्रभात शेंडे, प्रमोद येलमुले आणि योगेश मडावीव या मित्र परिवाराच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला. सर्वांनी मिळून रुग्णांना फळांचे वाटप करत त्यांच्या आरोग्याबाबत आपुलकी व्यक्त केली.
रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि त्यांना मानसिक आधार देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. फळांसारख्या पौष्टिक आहारामुळे रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास मदत होते, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. SPARKLEAF FOUNDATION च्या या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

