अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ६ जानेवारी:- भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष देशमुख, जिल्हा अध्यक्ष मनोहर कुंभारे सोबतच भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संजना मंदार मंगळे यांच्या नेतृत्वावर वर सावनेर करांनी पुर्ण विश्वास टाकत अध्यक्ष पदासह २१ नगरसेवक निवडून देत एकहाती सावनेर नगरपालिकेची सत्ता सोपवली आहे.
२१ डिसेंबरला निकाल लागल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष, नगरसेवकासह समस्त नगरवासीयांचे लक्ष पदग्रहण समारंभाकडे वेधले होती. ती उत्सुकता दि.६ जानेवारी २०२६ रोजी गणेश चतुर्थीच्या पावन प्रसंगी क्षेत्राचे आमदार आशिष देशमुख, राज्यस्तरीय सदस्य डॉ. राजीव पोतदार, नागपुर जिल्हा अध्यक्ष मनोहर कुंभारे ,भाजपाचे वरिष्ठ नेते दादाराव मंगळे, डॉ. विजय धोटे, प्रकाश टेकाडे, रामराव मोवाडे, माजी नगरसेवक तुषार उमाटे, सावनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आर्शीया जुही यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्ते,शहरातील गणमान्याच्या साक्षीने सौ.संजना मंदार मंगळे यांनी आज अध्यक्ष पदाचा कार्यभाळ सांभाळला.
सावनेर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सौ.संजना मंगळे यांनी आज अत्यंत उत्साही वातावरणात आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये मोठ्या जनसमुदायाच्या साक्षीने त्यांनी पदभार ग्रहण केला. यावेळी “जनतेच्या आशीर्वादाने मी या खुर्चीवर बसली असून सावनेर नगरीला सुरक्षित, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि स्वच्छ शहर बनवणे हेच माझे ध्येय आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
पदभार स्वीकारल्यानंतर सौ संजना मंगळे यांनी पत्रकारांसोबत वार्तालाप केला त्यावेळी त्यांनी सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्व तसेच नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, क्षेत्राचे आमदार आशिष देशमुख, जिल्ह्याचे तडफदार जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, वरिष्ठ नेते रामराव मोवाडे आदिंनी मिळून सावनेर नगरीला विकासाच्या मार्गवर नेणारा आम्ही जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्या जाहीरनामाला समोर ठेवूनच विकास कामाला सुरुवात करणार असून पुढील पाच वर्षात नगरीचा कायापलट करूण नक्कीच दाखवू असा ठाम विश्वास व्यक्त करत म्हटले की आम्ही प्रयत्नशील आहोत आणि हे करण्यासाठी मला सर्व नगरसेवकांचे पाठबळ देखील मिळेल असा विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाच वर्षे कामकाज करणे सोयीचे जावे याकरिता सावनेरकरांनी आपले बहुमोल मताने आमचा विजय निश्चित करत अध्यक्ष पदासह २१ नगरसेवक म्हणजेच २२ लोकांना नगरीची सत्ता सोपवली असल्याने सर्वजण मिळून काम करणार व मिळिलेल्या संधीचे सोनं करुण दाखवू असा निर्धार याप्रसंगी व्यक्त केला.
याप्रसंगी आपले विचार व्यक्त करत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी म्हटले की सावनेरकरांनी आमच्या शब्दाला मान देत आमच्यावर जो विश्वास टाकला त्यास कधीही तडा़ पडू देणार नाही. आम्ही विकासाच्या नावावर मते मागितलि आहे. तर विकास काय व कसा असतो तो आमदार आशिष देशमुख, राज्याचे राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पौराणिक व सांस्कृतिक महत्वप्राप्त सावनेर नगरीला गतवैभव मिळवून देण्यासाठी टोकाचे प्रयत्न करु असे मत व्यक्त केले.
फडकवून टाकला झेंडा: क्षेत्राचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी आपल्या चिरशैलीत संबोधित कर म्हटले की “फडकवून टाकू झेंडा” विकासाच्या नावावर, प्रगतीच्या नावावर, मागील तीसवर्षापासून लागलेली अवदसा मिटवीण्याच्या नावावर सावनेर करांनी जो विश्वास भारतीय जनता पक्षावर दाखवून एकाहाती सत्ता दिली त्याबद्दल सावनेरकर मतदात्यांचे आभार मानले व आजपासून एक नविन पर्व, एक नवीन जवाबदारीच्या कामाला आमच्या नगराध्यक्षा संजना मंगळे व त्यांचे सहकारी सुरुवात करत आहो. मी आपणास आश्वस्त करतोकी सावनेर नगरीच्या विकास कार्याकरीता निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही याप्रसंगी बोलतांना दिली.
भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा संजना मंदिर मंगळे समेत नगरसेवक नीलेश पटे, वनिता घुगल, राजेश गुप्ता, सौ.रिमा बालाखे, योगिता घोरमारे, आशीष मानकर, सोनाली उमाटे, शालिक मोहतुरे, अरविंद ताजने, नलिनी नारेकर, कोकिला जाधव, चित्रा वाठ, दुर्गेश पारवे ,अपर्णा उज्ज्वल बागड़े, रवींद्र ठाकुर, मनीषा लोधी, सुचिता बापूराव सूरे, महेश चकोले, अश्विनी वसंत सैयाम, राजू घुगल, राजुभाऊ भुजाडे अश्या एकुण २१ नगरसेवकांनी ही आपआपले पदभार सांभाळले. आयोजनाचे संचालन संदेश खंडागळे यांनी तर आभार कले यांनी मानले.

