हनिशा दुधे.चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9764268694.
चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर आज बंगाली कॅम्प, वार्ड क्रमांक ४ परिसरामध्ये भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिकांसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान सर्वांशी संवाद साधत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाच्या विकासाभिमुख धोरणांची माहिती दिली.
यावेळी आगामी निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या सौ. जयश्री महेंद्र जुमडे, श्री. आकाश म्हस्के, सौ. सारिका संदुरकर, श्री. रॉबिन विश्वास या अधिकृत उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. जनतेचा वाढता विश्वास आणि उत्साह पाहता येणाऱ्या निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास यावेळी व्यक्त केला.

