मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील संकल्पा मनमोड़े ह्या आंतरराष्ट्रीय एबेकस प्रशिक्षक आहेत आणि त्यांनी एबेकस शिक्षणाच्या माध्यमातून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय काम केले आहे. त्यांनी एक हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना एबेकसचे प्रशिक्षण दिले आहे.त्यांचे विद्यार्थी भारतातच नव्हे तर अमेरिका, लंडन, अफ्रीका, युरोप, अबूधाबी आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमधून ऑनलाइन एबेकसचे प्रशिक्षण घेत आहेत.
एबेकसच्या माध्यमातून मुलांच्या अभ्यासातील गती, एकाग्रता, स्मरण शक्ति व आत्मविश्वासात उल्लेखनीय वाढ होते. त्यांच्या ५० विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरच्या एबेकस स्पर्धेत भाग घेतला आणि उत्कृष्ट गुण प्राप्त केले. या त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संकल्पा मानमोडे यांना ‘बेस्ट टीचर एक्सीलेंस अवॉर्ड’ने सम्मानित करण्यात आले आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

