विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मोबाईल क्र 9421856931
एटापल्ली तालुक्यात भारतीय जनता पार्टी तालुका जनसंपर्क कार्यालय येथे
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त
ध्वजारोहणाचा भव्य व शिस्तबद्ध कार्यक्रम
दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.45 वाजता
उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमात
ध्वजारोहण मा. श्री बाबलाजी शांतीरंजन मुजुमदार
(तालुका महामंत्री)
यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत
जय हिंद व वंदे मातरम् च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमास
तालुका व जिल्हा पदाधिकारी,
विविध समाज संघटनांचे पदाधिकारी,
युवा मोर्चाचे कार्यकर्ते
तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना
तालुका अध्यक्ष प्रसाद चंद्रशेखर पुल्लूरवार यांनी
प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगून
संविधानाचे मूल्य, राष्ट्रसेवा व एकतेचा संदेश दिला.
कार्यक्रम शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला
आणि शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
