हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी मो.9764268694.
बल्लारपूर :- महिला भोई समाज संघ, बल्लारपूर तर्फे आयोजित तिळसंक्रांत (हळदीकुंकू) तसेच स्नेहमिलन कार्यक्रम शनिवारी दि २४ जानेवारी रोजी उत्साहात पार पडला. बल्लारपूर शहरातील विखुरलेला भोई/ढीवर समाज एकत्र यावा व समाजातील महिलांमध्ये एकोपा वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्याश्री कॉन्वेंट, खंडेलवाल बिल्डींग (वस्ती विभाग), बल्लारपूर येथे दुपारी २ वाजेपासून कार्यक्रमास सुरुवात झाली. दीप प्रज्वलन व महर्षी वाल्मीकी पूजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर उपस्थित महिला भगिनींचा स्वपरिचय कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमात सांस्कृतिक व नृत्य सादरीकरणाने विशेष रंगत आणली. महिलांसह लहान मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. नृत्य-नाटिका, वेळेवर आलेल्या महिलांना वाण वाटप तसेच अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजातील महिलांनी आपल्या भावना व्यक्त करत समाज संघटन मजबूत करण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला कार्यकारिणीच्या अध्यक्ष प्रतिभा वाघाडे, उपाध्यक्ष भारती भोयर, सचिव विद्याताई घुबडे, कोषाध्यक्ष मिना गौर व किरण ठमके, सहसचिव सौ. कमल बामणे व वैशाली पचारे, सल्लागार विजयाताई गेडाम व सोनाबाई मांढरे, तसेच आरती मांढरे, उषाताई बामणे, हेमा कुमलवार, गिता गोंदे, अलका पचारे, अलका कामतवार, सपना शिवरकर, पुष्पा भोयर सह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

