विश्वास वाडे प्रतिनिधी चोपडा
चोपडा:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्तने प्रांत अधिकारी सीमा अहिरे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयातील तालठी मिटींग हॉलमध्ये सर्व विभागा प्रमुखांची बैठक घेण्यात आली या बैठकीत 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत च्या या महोत्सवात विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत तरी कुठल्या विभाग कडून कोणत्यां कार्यक्रम राबविण्यात येवे यासाठी अधिकाराच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील सर्व ग्राम पंचायत स्तरापासून तालुक्यास्तरावर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्या अमृत महोत्सव निमित्ताने चोपडयात 75 फुटांचा तिरंगा ध्वज व स्तंभ रोपविणे, रांगोळी स्पर्धा, वृक्षारोपण, घरा घरावर ध्वज फडकविणे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रांत अधिकारी सीमा अहिरे यांनी सांगितले यावेळी तहासिदार अनिल गावित, नायब तहसीलदार सचिन बाबुंळे यांच्यासह विविध विभागतील अधिकारी बैठकीत उपस्थित होते..