मधुकर गोंगले उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*अहेरी :-* दिनांक २फेब्रुवारी २०२६ रोज सोमवारला संघमित्रा बुद्ध विहार आल्लापल्ली येथे संविधानाचे निर्माते, विश्वरत्व, महामानव, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ यांचा ११३ वा स्मृति दिन साजरा करण्यात आला.
त्या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा गडचिरोली दक्षिण चे कोषाध्यक्ष आयु प्रा संजय पठाडे सर यांनी सुभेदार रामजी सकपाळ हे बाबा साहेबां यांना कसे घडवले, त्यांना कोणते संस्कार दिले, त्यांची पुस्तकाची गरज कशी पार पाडली यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
बाबा साहेबांनी खूप शिकावे व आपल्या समाजाला दयनीय अवस्थेतून बाहेर काढावे, अशी त्यांची इच्छा होती. अशा अनेक उदाहरणासहित प्राध्यापक .पठाडे सरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन आयु भिमराव झाडे यांनी केले तर
आभार आयु अमोल दुर्योधन यांनी केले.
कार्यक्रमाला अनेक उपासक, उपासिका यांची उपस्थिती होती.
सर्वांना अभिवादन जयभीम नामोबुधाय जयसविधान. परत एकदा सुभेदार रामजी सकपाळ यांच्या ११३. व्या स्मृती दिनानिमित्त त्यांना कोटी कोटी अभिवादन.

