अहेरी:- अहेरी तालुक्यातील पेरमिली गावात राजे फाउंडेशन मंडळ वतीने 2 फेब्रुवारी रोजी पेरमिली येथे पाठीराखा या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचे अवचित्य साधून गाव पातळीवर पत्रकारितेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल तालुका पत्रकार संघटनाचे उपाध्यक्ष आसिफ खान पठाण व पत्रकार श्रीकांत दुर्गे यांचे उत्कृष्ट पत्रकार म्हणून माजी राज्यमंत्री राजे अमरीशराव आत्राम यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला होता. माजी राज्यमंत्र्याच्या हस्ते हा सत्कार झाल्याने काही माध्यमाने व पक्षातील काही कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केल्याचे तर्क वितर्क लावले होते. मात्र तालुका पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष आसिफ खान पठाण यांनी भाजपात पक्षप्रवेश केल्याचे खंडन केले आहे. माजी राज्यमंत्र्याचे हस्ते करण्यात आलेला पक्षप्रवेश नसून उत्कृष्ट पत्रकारितेचा सत्कार असल्याचे म्हटले आहे.
पत्रकार हे कोणत्याही पक्षाचे नसून एक सामाजिक उपक्रम राबवून व नेहमी सामाजिक कार्य करीत असतात. पत्रकार अशिफ खान पठाण हे कोणत्याही पक्षात प्रवेश केले नसून त्यांचा उत्कृष्ट पत्रकार म्हणून सत्कार करण्यात आला होता. हे विशेष.

